Solar Agriculture Pump : ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’योजनेतून राज्यात एक लाख पंप

Solar Energy : शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा तुटवडा भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेतून सौर कृषिपंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत.
PM Kusum Solar Pump
PM Kusum Solar PumpAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा तुटवडा भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेतून सौर कृषिपंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत.

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात १,०१,४६२ सौर कृषिपंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. जालन्यात सर्वाधिक सौर कृषिपंप बसवले असून त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात बसवले आहेत. सौर पंपाचा लाभ घेण्यात मराठवाडा, अहिल्यानगर आघाडीवर आहे.

विजेचा तुटवडा असल्याने व शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी काही वर्षांपासून सौर कृषिपंप योजना राबवली जात आहे. तर त्यात आता ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेचा समावेश केला आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

PM Kusum Solar Pump
Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपासाठी नऊ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांकडूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असून मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरू झाल्यापासून महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे.

PM Kusum Solar Pump
Solar Agriculture Pump : लातूर परिमंडलातील तीन जिल्ह्यांत १९ हजार ९५७ सौर कृषी पंपांची जोडणी

राज्यात १,०१,४६२ सौर कृषिपंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. त्यात जालना पहिल्या स्थानी, तर बीड दुसऱ्या स्थानी आहे. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसूम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के, तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते.

त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. महावितरणने आतापर्यंत गेल्या काही वर्षांत विविध योजनांच्या अंमलबजावणीतून २ लाख सौर कृषिपंप बसविले आहेत.

सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते.

सर्वाधिक सौरपंप बसवलेले सहा जिल्हे

- जालना ः १५,९४०

- बीड ः १४,७०५

- परभणी ः ९,३३४,

- अहिल्यानगर ः ७६३०,

- छत्रपती संभाजीनगर ः ६२६७

- हिंगोली ः ६०१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com