Power Generation : पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या

Rooftop Solar Energy : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे. यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वीज निर्मितीची गरज आहे.
Rooftop Solar Scheme
Pm Surya Ghar Yojana Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे. यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वीज निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव शेणपुंजी तालुका गंगापूरच्या वतीने मंगळवारी (ता.१) रांजणगाव शेणपुंजी येथील रावते मंगल कार्यालयात ‘हर घर सोलर, घर घर उजाला,’ पंतप्रधान सूर्यघर योजनेबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Rooftop Solar Scheme
Surya Ghar Scheme : सोलापुरात सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण

कार्यक्रमाला बाजार समिती गंगापूरचे संचालक दीपक बडे, सरपंच योगिता महालकर, उपसरपंच शिवराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्या उषा हिवाळे, दत्तू हिवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले उपस्थित होते.

Rooftop Solar Scheme
PM Surya Ghar Yojana : सुर्यघर प्रकल्पासाठी मिळणार ‘जनसमर्थ’कडून ९० टक्के कर्ज

ग्रामपंचायतीने ‘हर घर सोलर घर घर उजाला’ हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून प्रत्येक कुटुंबाने आपल्या छतावर वीज निर्मितीसाठी सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन केले.

आमदार प्रशांत बंब म्हणाले, की आपल्या छतावर सोलर पॅनेल बसून संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण व्हावा असे काम करावे. यासाठी आमदार म्हणून जी काही मदत लागेल ती पूर्ण करू. यासाठी बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी संपूर्ण माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com