
Solapur News : इच्छा असूनही पैशाअभावी घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविण्यात असमर्थ ठरणाऱ्या वीजग्राहकांसाठी केंद्रसरकारने ‘जनसमर्थ’चे बळ देऊ केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी एका क्लिकवर ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज मिळवता येते आणि ७८ हजारांचे अनुदान सुद्धा, विशेष म्हणजे सौर प्रकल्पासाठी गृहकर्जापेक्षा स्वस्त अगदी ७ टक्के पेक्षा कमी दराने हे कर्ज मिळते.
ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. या क्षमतेच्या प्रकल्पासाठी २ लाखाच्या आत खर्च येतो. घराची रचना, उंची यामुळे ५ ते १० हजारांचा फरक येऊ शकतो. प्रकल्पासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम निवडसूचीतील ठेकेदाराकडून सूर्यघर प्रकल्पाचे कोटेशन घ्यावे.
त्यानंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून व ठेकेदाराची निवड करून कोटेशन अपलोड करावे. नोंदणी पूर्ण झाल्याचा SMS दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. सूर्यघरची नोंदणी पूर्ण झाल्यावर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. विचारलेली माहिती भरल्यावर विविध राष्ट्रीयकृत बँका व त्यांचे व्याजदर समोर येतील.
ग्राहकाने त्याच्या सोयीनुसार बँक व शाखा निवडावी. SMS वर मिळालेला नोंदणीक्रमांक योग्य ठिकाणी टाकून माहिती भरावी. व्हेरिफिकेशन पूर्ण करुन बँक कर्ज मंजूर करते. ठेकेदाराने काम पूर्ण केल्यावर महावितरणकडून पडताळणी होते आणि दिलेल्या बँक खात्यावर काही दिवसांत ७८ हजारांची सबसिडी जमा होते, अशी ही पद्धत आहे.
मोहोळच्या वीजग्राहकाला लाभ
मोहोळ तालुक्यातील चिखली येथील हनुमंत रामलिंग चौधरी या ग्राहकाने कोणतीही पदरमोड न करता हा प्रकल्प बसवला आहे. त्यांच्या ३ किलोवॅट प्रकल्पाला स्टेट बँक ऑफ इंडियाने ७ टक्के दराने २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर १३ मार्चला त्यांच्या प्रकल्पाची पडताळणी झाली आणि त्यांना अवघ्या ७ दिवसांत ७८ हजारांचे अनुदान केंद्र सरकारतर्फे प्राप्त झाले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.