Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

Solar Energy : शिर्डी (जि. नगर) या संपूर्ण शहराला सौर शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ५० मेगावॉट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Solar Energy
Solar EnergyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शिर्डी (जि. नगर) या संपूर्ण शहराला सौर शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ५० मेगावॉट क्षमतेचा वीजपुरवठा आता टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक सौर ऊर्जेवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शिर्डी शहरातील घरगुतीसह सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

चार महिन्यांत (डिसेंबर अखेर) हे शहर शंभर टक्के सौर शहर होणार असल्याचे महावितरणचे संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी सांगितले. शिर्डी (जि. नगर) महावितरणच्या शिर्डी उपविभागाच्या वतीने शिर्डी सौर शहर करण्यासाठी बुधवारी (ता. ४) ग्राहक, वित्तीय संस्था (बॅन्क), सौरप्रणाली विक्रेते आणि अभियंते यांच्याशी महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी संवाद साधला. रशमे म्हणाले, की

Solar Energy
Solar Panel : ‘निरी’चा यांत्रिक हात करणार सौर पॅनेलची स्वच्छता

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्र शासनाकडून सबसिडी देण्यात येत असून त्यामुळे शिर्डी शहरातील सर्व वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि शिर्डी शहर सौर शहर करण्यासाठी समाजातील व प्रशासनातील सर्व घटकांच्या सहकार्याची गरज आहे.

सौर योजनेत सहभाग घेऊन आपण पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य करीत असून त्या माध्यमातून हरीतऊर्जा निर्माण करीत असल्याचे सांगितले. या योजनेमध्ये महावितरण्याच्या माध्यमातून आणखी गतीमानता येणार असून वीज जोडणीसाठी कुणालाही महावितरणच्या कार्यालयात येण्याची गरजच राहणार नाही.

Solar Energy
Solar Power Project : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू

शिर्डी सौरशहर आराखड्याची विस्तृत माहिती संगणकीय सादरीकरणातून दिली शिर्डी शहर संपूर्णतः सौर करण्याकरिता तयार करण्यात आलेला नियोजन आराखड्याची माहिती दिली ही योजना यशस्वी करण्यासाठी महावितरण गतीने कार्यरत असून त्यामुळे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असे सांगण्यात आले.

या वेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर, कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुनील काकडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता रमेश पवार, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, साकेत सुरी, कार्यकारी अभियंता अनिल थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी तर नगर मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश पवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com