CM Solar Scheme : सौर प्रकल्पातून १८५० कृषिपंपांना दिवसा वीज

Agriculture Pump Electricity : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राज्यात राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊर्जानिर्मिती सुरू झाली आहे.
CM Solar Scheme
CM Solar Scheme Agrowon
Published on
Updated on

Nashik News : महावितरणच्या कृषिपंप ग्राहकांना अखंडित, शाश्वत व दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमधून चांदवड विभागांतर्गत असलेल्या शिरूरतांगडी प्रकल्पातून ५ मेगावॉट विजेची निर्मिती सुरू झाली असून यामधून १ हजार ८५० कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा मिळत आहे.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार हे चांदवड दौऱ्यावर असताना शिरूरतांगडी येथील प्रकल्पाला भेट देऊन सौर प्रकल्पाची पाहणी केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राज्यात राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी ऊर्जानिर्मिती सुरू झाली आहे. पवार यांनी प्रकल्पाची पाहणी केली व आढावा घेतला.

CM Solar Scheme
CM Solar Scheme: राज्यात १०७१ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारणार : फडणवीस

यासह त्यांनी चांदवड विभाग व उपविभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपले काम करावे. ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी असे यावेळी पवार म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन संघटना व चांदवड पतसंस्था यांच्या वतीने संचालक राजेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला.

CM Solar Scheme
Solar Pump Scheme : पैसे भरून, मागणी करूनही सौर कृषी पंप मिळेना

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. व्हि.डी.धनवटे होते. यावेळी अरुण म्हस्के, पंडितराव कुमावत, पंडितराव पगार, दीपक गांगुर्डे, विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था चांदवड, नाशिक पतसंस्था संचालक मंडळ तसेच संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यासोबतच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुद्धा संचालक राजेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, अभियंते, अधिकारी व जनमित्र उपस्थित होते.

दहा गावांतील ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा

नाशिक मंडळातील चांदवड उपविभाग अंतर्गत असलेल्या देशवंडी येथील प्रकल्पातील ५ मेगावॉट वीज निर्मितीला सुरुवात झाली असून या प्रकल्पातून शिरूर तांगडी विद्युत उपकेंद्रातील शिरूरतांगडी,आसरखेडे, आडगाव व तळवाडे या चार ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या माध्यमातून शिरूर तांगडी, खेलदरी आसरखेडे, मतेवाडी, देणेवाडी, मंगरूळ,आडगाव, चिंचोले, तळवाडे,भरवीर या दहा गावांमधील १ हजार ८५० कृषिपंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com