
Chh. Sambhajinagar News : प्रतीक्षेत असलेल्या सौरपंपाविषयी ‘ॲग्रोवन’ने वृत्त प्रकाशित करताच जालना जिल्ह्यातील सिरजगाव मंडप (ता. भोकरदन) येथील बाळू सहाणे यांचे सौर पंप संबंधित कंपनीने तत्परतेने बसविले. त्यामुळे त्या शेतकऱ्याने ॲग्रोवनचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
माहितीनुसार, की जालना जिल्ह्यातील सिरजगाव (मंडप) (ता. भोकरदन) येथील बाळू भास्कर सहाने या शेतकऱ्याने मार्च २०२४ मध्ये सौर पंपसाठीची रक्कम भरली. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला, मेडाच्या अधिकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्वांशी बोलून झाले.
मात्र फक्त मिळेल मिळेल असे उत्तर त्यांना मिळत होते. ॲग्रोवनने याविषयी एक जुलै रोजी वृत्त प्रकाशित करताच जागे झालेल्या संबंधित सौर पंप कंपनीने दोन जुलै रोजी श्री. सहाने यांचे सौर पंप बसवून दिले.
सौर पंपाची प्रतीक्षा कायम
छत्रपती संभाजीनगर शहरातील कीर्ती सहकारी गृह निर्माण संस्था एन ८ सिडकोमध्ये राहणाऱ्या पुष्पाबाई बळवंत रगडे यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या (महाऊर्जा)च्या सरव्यवस्थापकांना तब्बल चौथे स्मरणपत्र पाठविले. त्यानुसार, त्यांच्या विहिरीवर २२ मार्च २०२४ ला सौर पंप मंजूर झाला होता. त्यांचा लाभार्थी क्रमांक १५०५२७११३३ असा आहे.
परंतु जवळपास दीड वर्षापासून त्यांच्या विहिरीवर सौर पंप कंपनीच्या हलगर्जीमुळे सौर पंप बसविला गेलेला नाही. या संदर्भात १६ एप्रिल २०२५ तसेच १६ नोव्हेंबर २०२४, १६ एप्रिल २०२४ व ९ मे २०२५ रोजी अर्ज सादर केले होते. २६ जून २०२५ ला दिलेल्या आपल्या पंतप्रधान तक्रारकर्त्या सौ. रगडे यांनी सरव्यवस्थापकांना प्रश्न करत आपला पंप न बसविता त्याचे देयक दिले आहे काय, सौर कंपन्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर पंप पसरण्यास हलगर्जी करीत असतील तर त्यांच्याविरुद्ध आपण योग्य कारवाई करणार का याविषयी विचारणा केली.
यावेळी स्मरणपत्र देताना सौ. रगडे यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर त्वरित सौर पंप बसविण्याची पावले उचलावी अशी विनंती महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण महाऊर्जाचे सर्व व्यवस्थापक यांना केली होती.
याविषयी ‘ॲग्रोवन’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित कंपनीच्या पुणे कार्यालयातून व छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिनिधींकडून विचारणा केली गेली. त्यापुढे अजून हालचाल झाली नसल्याचे बळवंत रगडे म्हणाले.
तक्रारीची सुविधा दिली, मात्र पैसे भरून पंप मिळेना
एकीकडे महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी वेबसाइटवरून तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाइटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता मोबाइल फोनवरील महावितरणच्या अॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पैसे भरून, प्रक्रिया करून, स्मरणपत्र देऊनही सौर पंप बसतच नसेल तर करावे काय हा प्रश्न बळवंत रगडे यांनी उपस्थित केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.