Dairy Farming : एका गाईपासून ३३ गायींपर्यंतचा प्रवास ; कल्पनाताईंच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा

Women's Day 2025 : सातारा जिल्ह्यातील कापशी येथील कल्पना दीपक काळंगे यांनी एका गाईपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गोसंगोपनाची आवड, कष्टांची जोड, व्यवस्थापनातील कौशल्य या गुणांच्या जोरावर व्यवसाय ३३ गाईंपर्यंत विस्तारला. पतीच्या साथीने दुग्ध व्यवसायातून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे.
Women Entrepreneurship In Dairy Business
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Dairy Business Success Story : सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात सर्वाधिक दुग्ध व्यवसाय होतो. व्यवसायात महिलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कापशी येथील कल्पना दीपक काळंगे या त्यापैकीच एक आहेत. आपल्या लहानग्या दोन मुलांच्या दुधाची सोय म्हणून यासाठी त्यांनी गाय घेतली होती. त्यातूनच त्यांना दुग्ध व्यवसायाची आवड निर्माण झाली. केवळ घरच्यापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक दृष्टिकोनातून तो वाढविल्यास कुटुंबाचे अर्थकारण मजबूत होऊ शकते.

आपल्या मनात आलेला हा विचार त्यांनी पती दीपक यांना सांगितला. त्यांनीही पत्नीला प्रोत्साहन दिले. कुटुंबाची पूर्वीची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. दोन एकर शेती आणि दहा बाय दहा फूट आकाराच्या घरात कुटुंब राहायचे. व्यवसायाची सुरवात छोट्या बंदिस्त गोठ्यापासून झाली. टप्प्याटप्प्याने चार गाई खरेदी केल्या. सन २०१६ मध्ये कर्ज काढून ५० बाय ६० फूट आकाराचे दोन मुक्तसंचार गोठे बांधले. गोठा व्यवस्थापानाची मुख्य जबाबदारी कल्पनाताईंनीच उचलली.

Women Entrepreneurship In Dairy Business
Dairy Farming : 'लक्ष्मी'मुळे दुग्ध व्यवसायात भरारी

जातिवंत पैदाशीवर भर

व्यवसायाच्या पुढील टप्प्यात गाईंची खरेदी न करता गोठ्यातच उच्च वंशावळीच्या, अधिक दुग्धक्षमतेच्या व आजारांना कमी बळी पडणाऱ्या अशा गाईंची पैदास करण्यावर भर दिला. या प्रयत्नांतून गोठ्यामध्ये आज जातिवंत ३३ गाई पाहण्यास मिळतात. सध्या दररोजचे दूध संकलन २६० लिटरच्या आसपास आहे. दीपक्लप डेअरी फार्म असे व्यवसायाचे नामकरण केले आहे. शेतीक्षेत्र कमी असल्याने चारा बऱ्यापैकी विकत आणावा लागे.

आज योग्य पद्धतीने ओला- सुका चारा व पूरक खाद्य या पद्धतीने जातीने आहार व्यवस्थापन व औषधोपचार- लसीकरण केले जाते. त्यामुळेच गाईंचे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आरोग्याच्या काही अडचणी उद्‍भवल्या, तर आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करून प्राथमिक स्वरूपाचे उपचार केल जातात. व्यवसाय सांभाळून कल्पनाताईंनी प्रक्रियायुक्त शेणखत तयार करण्यावरही भर दिला आहे. महिन्याकाठी तीन ते चार टन खत तयार होते, स्वतःच्या शेतात त्याचा वापर करून शेतकऱ्यांनाही विक्री होत असल्याने उत्पन्नात वाढ होते.

Women Entrepreneurship In Dairy Business
Dairy Farming: गोपालनात आहार, आरोग्य, गोठा व्यवस्थापनावर भर

साधली प्रगती

कल्पनाताईं व्यवसायातील प्रत्येक गोष्ट बारकावे जाणून करतात. गाईंचे दूध, कृत्रिम रेतन केल्याची तारीख, जमा-खर्च असा सारा ताळेबंद त्या नोंदवहीमध्ये ठेवतात. त्यातूनच व्यवसायाचे अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले आहे. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहता यावे यासाठी त्या झटत असतात.

पतीचीही त्यांना तितकीच समर्थ साथ मिळतो. त्यांचा मुलगा एका परदेशी कंपनीत कार्यरत असून, मुलगी कृषी क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. शेती व दुग्धव्यवसायातून कुटुंबाला टुमदार बंगला बांधणे शक्य झाले आहे. फलटण येथील गोविंद डेअरीतील आधिकारी, कर्मचारी यांची मदत व मार्गदर्शन त्यांना मिळते.

कल्पना काळंगे ९८८१५९३२०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com