DPDC Funding: शेतकऱ्यांसाठी टेक्नोलॉजीची नवी संधी! ड्रोनसाठी ‘डीपीडीसी’ निधी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

Collector Jitendra Dudi: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
Collector Jitendra Dudi
Collector Jitendra DudiAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यात महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन खरेदीसाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळण्याची मागणी केली. त्यावर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ५) आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचा आढावा घेण्यात याला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

Collector Jitendra Dudi
Drone Technology: ड्रोन उपलब्धतेसाठी गावागावांत प्रयत्न करा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, की शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्यादृष्टीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करावी. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे कसे वळविता येईल यादृष्टीनेदेखील प्रयत्न करावेत. कृषी विभागाने आपले नियमित काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण बाबी करण्यावर भर द्यावा.

Collector Jitendra Dudi
Drone Pilot Training: दापोली कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र मंजूर

पुणे व मुंबई यातील जवळचे अंतर, मोठी बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी जवळची सुविधा असलेले मुंबई शहर या जिल्ह्यासाठी जमेच्या बाजू आहेत. जिल्ह्यात फलोत्पादन आणि फूल शेतीच्या वाढीला मोठा वाव असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात सध्या लागवड होत असलेली वैशिष्ट्यपूर्ण फळपिके, फूलशेती तसेच अन्य कृषिमाल व त्यांचे शेतकरी व लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. एकच वैशिष्ट्यपूर्ण पीक अधिक प्रमाणात उत्पादित करणारे गाव किंवा गावांचा समूह निवडून या पिकाचे क्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. त्या गावाची प्रसिद्धी त्या पिकांच्या नावाने कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com