Crop Loan : पीक कर्जासाठी ५२०० कोटींची तरतूद

Kharif Crop Loan : अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात यंदा पीक कर्जासाठी ५ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Solapur News : एकेकाळी रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षात खरिपाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात यंदा पीक कर्जासाठी ५ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ४ हजार ६०० कोटींची तरतूद होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्र उपलब्ध असते. यावर्षी मॉन्सून वेळेत येणार असल्याचे आणि सरासरीच्या १०० टक्के पाऊस सांगितला आहे. यावर्षी पेरण्यांचा टक्का वाढणार असल्याचे गृहित धरून यंदा ही वाढ केल्याचे समजते.

Crop Loan
Crop Loan Chaos: पेच कर्जवसुली अन् वाटपाचा!

यंदाच्या खरिपासाठी २ हजार ८६० कोटी रुपयांची तर रब्बीसाठी २ हजार ३४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऊस आणि केळीचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबिनचेही क्षेत्र अलीकडे वाढत आहे. रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून एकेकाळी सोलापूरची ओळख होती. आजही जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

Crop Loan
Soybean Crop Loan : सोयाबीनला हेक्टरी ७५ हजारांचे पीक कर्ज

दरम्यान, जिल्ह्यासाठी २०२५-२६ च्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी (ता. १४) जिल्हा नियोजन भवनात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०२५-२६ या वर्षासाठी जिल्ह्याच्या पीक कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, उद्योगासाठी कर्ज यांच्या उद्दिष्टाचा वार्षिक पतपुरवठा आराखडा अंतिम केला जाणार आहे.

गेल्या वर्षीचा खरीप (रु.)

उद्दिष्ट २ हजार ५२७ कोटी

वाटप २ हजार ६३२ कोट

लाभार्थी १ लाख ४२ हजार ७३५

टक्केवारी १०४

गेल्या वर्षीचा रब्बी (रु.)

उद्दिष्ट २ हजार ७२ कोटी

वाटप २ हजार १४७ कोटी

लाभार्थी ८८ हजार ८१२

टक्केवारी १०३

पीक कर्जामध्ये जे शेतकरी थकीत झाले आहेत. त्यांच्या बाबतीत योग्य तोडगा काढून पीक कर्ज मिळण्याची व्यवस्था व्हावी. शेतीसाठी लागणारे साहित्य, शेतीतील मजुरी, शेतीचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे पीकनिहाय कर्जाची मर्यादाही वाढविण्याची गरज आहे. तुर्तास कांदा, फळबागा यासाठी पीक कर्ज वाढवून देण्याची गरज आहे.
- समाधान वाघ, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com