Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणावरून सोशल मीडिया वॉर

Bidri Sugar Kolhapur : विरोधी गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कारखान्याच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Bidri Sugar Factory
Bidri Sugar Factoryagrowon

Prakash Abitkar vs K.P. Patil : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चाचणी लेखापरीक्षणास सहकारमंत्र्यांनी दिलेला स्थगितीचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. या निर्णयावरून ''बिद्री''त पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांत राजकीय चर्चेला ऊत आला आहे. सोशल मीडियावर कार्यकर्ते एकमेकांना भिडत आहेत.

विरोधी गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कारखान्याच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ताधारी गटाला हा मोठा धक्का असल्याचे वातावरण तयार केले आहे, तर सत्ताधारी गटाचे नेते व विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांनी या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असल्याचे स्पष्ट उत्तर विरोधकांना दिले आहे. मात्र, या प्रश्नावरून कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

''बिद्री''च्या निवडणुकीपूर्वीच याप्रश्नी विरोधी गटाचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, डिसेंबर २०२३ मध्ये कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेतृत्व अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले, तर विरोधी आघाडीचे नेतृत्व आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

Bidri Sugar Factory
Kolhapur Rain : कोल्हापुरात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता, वारा, गारा, धारा कोसळणार

या निवडणुकीत विरोधी आघाडीने या प्रश्नासह इतर नऊ मुद्दे सभासदांसमोर मांडून प्रचाराचे रान उठविले. मात्र, सभासद सत्ताधारी आघाडीच्या पाठीशी राहिल्याने विरोधकांना याचा लाभ उठविता आला नाही. आता हाच प्रश्न पुन्हा नव्याने उच्च न्यायालयाच्या निकालानंतर चर्चेत आला आहे.

यामुळे कार्यकर्त्यांत निवडणुकीतील यश-अपयशाची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत काय घडले हे निकालानंतर कळेल आणि विधानसभेला काय होईल यावरून कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांना भिडत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com