Snowfall Update : उत्तर भारतात अनेक राज्यांत बर्फवृष्टी; पिकांचे मोठे नुकसान

Heavy Rain : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड येथे रविवारपासून (ता.३) सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे.
Snowfall and Rain
Snowfall and RainAgrowon

Delhi News : उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड येथे रविवारपासून (ता.३) सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. अनेक भागांत हिमस्खलनाच्या घटनाही घटल्याने ५०० हून अधिक रस्ते बंद ठेवावे लागले. तसेच पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडच्या काही भागात वादळी वारा तसेच गारपिटीचा तडाखा बसला.

सिमला हवामान विभागाच्या माहितीनुसार, कुल्लू, सिमला, चंबा, मंडी, किन्नौर जिल्ह्यांसह रविवारपासून (ता.३) अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. यामुळे राज्यातील ५०० हून अधिक रस्ते बंद ठेवण्यात आले.

Snowfall and Rain
Crop Damage : कुवे येथे वादळी पावसामुळे पिके भुईसपाट

पंजाबसह मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. गारपिटीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Snowfall and Rain
Hailstorm In Maharashtra : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिकं झाली भुईसपाट!

केंद्रीय मंत्री ज्‍योतिरादित्‍य सिंदिया यांनी अशोकनगर आणि शिवपुरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी प्रशासनाने तत्काळ पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबसह बिहारमध्येही गहू पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले.

यलो अलर्ट

काश्मीर, हिमाचल-उत्तराखंडमध्ये, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गंगोत्रीतील हाय वे बंद : बद्रिनाथ, गंगोत्री येथे सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. डेहराडून, पौडी, अल्मोडा या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com