Floods and Heavy Rains : महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य, कृषीमंत्री सकारात्मक

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वंचित घटकांना भरपाई देण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे सकारात्मकता दर्शवली आहे.
Floods and Heavy Rains
Floods and Heavy Rainsagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वंचित घटकांना भरपाई देण्याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली.

यावेळी मदत व पुनर्वसन, वित्त व नियोजन, तसेच कृषी विभागाचे सचिव हे शेडनेट, पॉलिहाउस, विद्युत पंप, कुक्कुटपालन, शेततळे व ठिबक सिंचन संच यांना नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नुकसान झाल्यास आर्थिक साहाय्य देण्याकरिता शासन निर्णय काढण्यासाठी कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवतील, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या प्रकल्पधारकांची कर्जे व हप्ते परत फेडीसाठी ज्या बँकेकडून कर्ज उचल केली आहे अशा बँकेच्या बरोबर वित्त व नियोजन विभागाचे अधिकारी चर्चा करतील. या घटकांना संरक्षण देणेकरिता विमा कंपनीसोबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

Floods and Heavy Rains
Kolhapur Dudh Sangh : दूध उत्पादकांना लुटणाऱ्या १६ दूध संस्थांना दुग्ध सहाय्यक निबंधकांकडून लेटर बॉम्ब

बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, मदत व पुनर्वसन उपसचिव संजय धारूरकर, कृषी आयुक्त पुणे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे उपस्थित होते.

कृषी विभागाचे सचिव हे शेडनेट, पॉलिहाउस, विद्युत पंप, कुक्कुटपालन, शेततळे यांना नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नुकसान झाल्यास आर्थिक साहाय्य देण्याकरिता शासन निर्णय काढण्यासाठी कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com