Mumbai News : माथेरान मार्गावर धुराचे लोट

Air Pollution News : माथेरान मार्गावरील सुकापूर, आकुर्ली ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक दुकानदार, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी कचरा टाकतात.
Mumbai News
Mumbai NewsAgrowon

कामोठे : माथेरान मार्गावरील सुकापूर, आकुर्ली ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक दुकानदार, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी कचरा टाकतात. तसेच रात्रीच्या वेळी हा कचरा जाळलाही जातो. कचऱ्याच्या धुरामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

माथेरान मार्गावर सुकापूर ते नेरे परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी संकुल निर्माण झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा विविध खाद्यपदार्थांची, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. अनेक दुकानदार ओला आणि सुका कचरा रस्त्याकडेला टाकत आहेत.

Mumbai News
Panand Road : नांदेडमधील ८७ गावांत पाणंद रस्ते मंजूर

हॉटेल, ढाबे, चायनीजच्या गाड्यावरील ओला कचरा आकुर्ली, हरिग्राम परिसरात आणून टाकला जात आहे. हरिग्रामजवळून जाणाऱ्या गाढी नदीकिनारी या कचऱ्याचा ढीग लागला आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या सर्रासपणे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नदीपात्रात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्या वेळी कचरा जाळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

माथेरान मार्गावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. रात्री-बेरात्री कचरा जाळतात. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
राजेंद्र जाधव, सुकापूर
रस्त्यावर कचरा टाकणारे, कचरा जाळणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात आहे. आकुर्ली ग्रामपंचायत क्षेत्रातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध सुरू आहे. नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी पंचायत समितीला सहकार्य करण्याची गरज आहे.
संजय भोय, गटविकास अधिकारी, पनवेल पंचायत समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com