Panand Road : नांदेडमधील ८७ गावांत पाणंद रस्ते मंजूर

नांदेड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच विधानसभा मतदार संघात ८७ गावांतील पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
Panand Road
Panand Road Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच विधानसभा मतदार संघात ८७ गावांतील पाणंद रस्त्यांना (Farm Road) मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक गावातील एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळाचा प्रश्‍न म्हणून पाणंद रस्त्यांकडे पाहिले जाते. पाणंद रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमण, पाणंद रस्त्यांची बदललेली दशा आणि हळूहळू पाणंद रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आले असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे येण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी अनंत अडचणी होत्या.

ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पाणंद रस्त्याच्या विकासकामासाठी भरीव असा निधी मंजूर केला आहे.

Panand Road
Farm Road : सोलापुरातील पाणंद रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी

पाणंद रस्त्याच्या विकासासाठी खासदार चिखलीकर यांनी पाठपुरावा केला होता. यातून ८७ गावांतील रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक गावात एक किलोमीटरचा रस्ता होणार असून, यासाठी २५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

मंजूर झालेल्या गावांमध्ये लोहा तालुक्यातील किवळा, ढाकणी, वडेपुरी, वडगाव, टेळकी, टाकळगाव, आडगाव, खडकमांजरी, पांगरी, सोनखेड, पोमानाईक तांडा, जानापुरी, दगडगाव, नांदेड तालुक्यांतील लिंबगाव, थूगाव, तळणी, वडवणा, बोरगाव, देगलूर तालुक्यांतील वझर, नागराळ, कंधार तालुक्यांतील चिखली, लालवाडी, सावळेश्वर, औराळ, बारूळ, गणा तांडा, पानशेवडी, हिरामण तांडा, गोगदरी, नंदनवन, मुदखेड तालुक्यांतील बारड, निवघा, आमदुरा, वासरी, रोहीपिंपळगाव, धनंज, मुगट, वाई, चिकाळा तांडा, तिरकसवाडी, पाथरड, भोकर तालुक्यांतील रेणापूर, कांडली, हळदा, जाकापूर, देवठाणा, हसापूर, रायखोड, उमरी तालुक्यातील धानोरा, धानोरा वाडी, बोळसा, धानोरा बुद्रुक, बितनाळ, महाटी, करमाळा, सोमठाणा, धर्माबाद तालुक्यातील चोंडी, बाळापूर, समराला, रत्नाळी, मुखेड तालुक्यातील बिल्लाळी, अर्धापूर तालुक्यातील देळूब खुर्द, मेंडला, कोंडा, बिलोली तालुक्यातील कासराळी, बेळकोणी बुद्रुक, सावळी, चिंचाळा, गुजरी, हुनगुंदा, नायगाव तालुक्यातील शेळगाव, कुंचोली, कंडाळा या गावातील पाणंद रस्त्याच्या कामाचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com