Grape Research Center : द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या दारी

Krishi Sankalp Abhiyan : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत ओडिशा येथून विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात झाली.
Farmer Training
Farmer TrainingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत ओडिशा येथून विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात झाली. त्यानुसार राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नाशिक विभागात दाखल झाले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर व नवीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत आहेत. १२ जूनपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

सध्याच्या समस्यांवर सल्ला, नवीन तंत्रज्ञान, ड्रोनचा वापर, माती आरोग्य पत्रिका, शाश्वत शेतीसाठी पद्धती इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नाशिक व धुळे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

२९ मे रोजी सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, चंद्रपूर आणि गुही या गावांमध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर, माती आणि पाणी तपासणीचे महत्त्व, खतांचा अचूक वापर, सेंद्रिय–नैसर्गिक शेतीचे महत्त्व, उच्च उत्पन्न देणाऱ्या हवामानास अनुकूल जाती, पीक विविधता, कीटकनाशकांचा योग्य वापर याबाबत माहिती देण्यात आली.

दुसऱ्या पथकाने नाशिकच्या कळवण तालुक्यातील दळवट, कोसुर्डे आणि शेपूपाडा या गावांना भेट दिली. शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिका, नैसर्गिक शेती, सोयाबीन लागवडीतील पद्धती आणि ‘पीजीआर’च्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली. मातीतील पोषकद्रव्ये आणि माती व पाणी व्यवस्थापनासाठी सेन्सरसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांसमोर दाखवण्यात आली. शेतीत ड्रोनच्या वापराबाबत जागरूक करण्यात आले.

Farmer Training
Grape Farming: आव्हाने पेलून जपली प्रयोगशीलता

सिन्नर तालुक्यातील चिंचोली, मोह आणि वडझिरे गावांतील पथकाने खरीप पिकातील समस्यांवर रोग व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुचवले. तसेच, त्र्यंबक तालुक्यातील पिंप्री, सापगाव व इतर गावांतील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शेतकऱ्यांना संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आवाहन करण्यात आले.

Farmer Training
Grape Farming Crisis: मॉन्सूनपूर्व पाऊस द्राक्ष पिकाच्या मुळावर

धुळे जिल्ह्यातील तावखेडा, दौल या गावांना भेट देणाऱ्या पथकाने शेतकऱ्यांना मातीतील ओलावा आणि एनपीके सेन्सरद्वारे रिअल-टाइम डेटा निर्मितीवर प्रात्यक्षिक दाखवले. शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतीतील निविष्ठांचा सुरक्षित वापर, हाताळणी आणि काळजी याबाबत माहिती देण्यात आली. धुळे जिल्ह्यातील उपरपिंड, बलदे या गावांना भेट देणाऱ्या दुसऱ्या पथकाने शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले.

नाशिक कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात डॉ. सुजॉय सहा, डॉ. रोशनी समर्थ, डॉ. डी. एस. यादव हे दाखल झाले आहेत. येथे मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, राजाराम पाटील, डॉ. श्याम पाटील, डॉ. प्रकाश कदम, अर्चना देशमुख, मंगेश व्यवहारे परिश्रम घेत आहेत. मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. अहमद शब्बीर यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com