Grape Farming Crisis: मॉन्सूनपूर्व पाऊस द्राक्ष पिकाच्या मुळावर

Rain Crop Damage: राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला असून, येणाऱ्या काडीवरील गर्भधारणा आणि फळधारणेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यातच रोगराईचा फटकाही बसणार आहे.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Sangali News: राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला असून, येणाऱ्या काडीवरील गर्भधारणा आणि फळधारणेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यातच रोगराईचा फटकाही बसणार आहे. द्राक्ष पिकाला मॉन्सूनपूर्व पावसाचे ग्रहण लागले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे साडेचार लाख एकरांवर विस्तारलेले आहे. गतवर्षीच्या हंगामात देखील मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला. या पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला. परिणामी, अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागा साधत हंगाम सुरळीत पार पाडला. गेल्या दोन ते तीन वर्षांपेक्षा संपलेल्या हंगामातील द्राक्षाला चांगले दर मिळाले. त्यामुळे केलेला खर्च शेतकऱ्यांच्या हाती आला.

Grape Farming
Grape Farming: आव्हाने पेलून जपली प्रयोगशीलता

द्राक्षाची खरड छाटणी पूर्ण झाली आहे. खरड छाटणी होऊन ४० ते ४५ दिवसांचा कालावधी झाला आहे. अनेक भागांत आगाप फळ छाटणीही घेतली जाते. त्यादृष्टीने शेतकरी हंगामाच्या तयारीचे नियोजन करू लागला आहे. विरळणी, शेंडामारणे अशी कामे सुरू होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून राज्यभर पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे बागेतील कामांना ब्रेक लागला आहे.

काडी पक्व होण्यासाठी तापमानाची आवश्यकता असते. परंतु ढगाळ वातावरण असल्याने काडी पक्व होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रामुख्याने गर्भ धारणा होण्यास मोठी अडचण आली आहे. जिवाणूजन्य करपा, डाऊनी, करपा यांसह अनेक रोगराईचा प्रादुर्भाव होईल, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस आणि ढगाळ वातावरण असेच राहिल्यास संकट वाढण्याचीही शक्यता आहे. सध्याच्या वातावरणामुळे किती नुकसान होईल, हे आताच सांगणे कठीण आहे. परंतु आठ ते पंधरा दिवसांनंतरच नुकसानीची दाहकता स्पष्ट होईल.

Grape Farming
Grape Farming : ‘द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी ‘क्यूआर कोड’

हंगामात येणाऱ्या अडचणी

गर्भधारणा, फळ धारणा होण्यास अडथळा

करपा, जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

कामे रखडली

रोगराईचे प्रमाण वाढणार

बागेतील कामांना ब्रेक

मॉन्सूनपूर्व पावसामुळे द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. अनेक संकटे निर्माण झाली आहेत. त्यामुळे पिकाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम घेऊन त्यावर उपाय योजना करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
- कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
गत वर्षी माल कमी होता, त्यामुळे वेली सशक्त आहेत. मात्र या वातावरणामुळे संकट ओढवले आहे. गर्भधारणा होण्यासाठी फवारण्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आतापासून खर्च करावा लागत असून खर्चही वाढणार आहे.
- चंद्रकांत लांडगे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मनेराजुरी, ता. तासगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com