
Parbhani News : शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. तरुण नवीन तंत्रज्ञान चटकन आत्मसात करू शकतात. परंतु तरुण शेतीपासून दूर जात आहेत ही चिंतेची बाब आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी तरुणांचा शेतीतील सहभाग वाढवावा लागेल, असे प्रतिपादन कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी शुक्रवारी (ता. ३०) ताडबोरगाव (ता. मानवत) येथे केले.
विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गंत शेतकऱ्यांशी संवाद साधला. माउली काजळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी धनराज जगताप, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके, जिल्हा कृषी उपसंचालक स्वप्नील जाधवर, तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड (मानवत), आबासाहेब देशमुख (पालम), गोविंद कोल्हे (पाथरी),
एस. पी. भालेराव (पूर्णा), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, विशेषज्ञ अमित तुपे, नागपूर येथील लिंबू वर्गीय फळपिके संशोधन संस्थचे वेंकटरमण बनसोडे, इफ्कोचे जिल्हा व्यवस्थापक तुषार घोराड, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
रस्तोगी म्हणाले, की विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. संशोधनाबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया (फिडबॅक) घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या अनुभवातून संशोधन तसेच तंत्रज्ञानात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.
सघन कापूस लागवड या तंत्रातील बारकावे जाणून घेत अंगीकार करावा. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार अॅपच्या माध्यमातून हवामान अंदाज व सल्ला, पीक लागवड तंत्रज्ञान, बाजारभाव आदी बाबत अधिकृत व व्यवस्थित माहिती शेतकऱ्यांच्या हातात उपलब्ध होणार आहे.
यावेळी रस्तोगी यांनी महाविस्तार अॅप डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांना या अॅपच्या वापराबाबत माहिती दिली. डॉ. गडदे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, तुपे यांनी सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, घोराड यांनी ड्रोनद्वारे फवारणी, देशमुख यांनी महाविस्तार अॅप, अॅग्रीस्टॅकचे महत्त्व यावर माहिती दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.