Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Plant Nursery : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील गुंदले येथील निकीता पाटील या अभ्यासू, प्रयत्नवादीयुवतीने प्रशिक्षणातून विविध वनस्पतींचा रोपवाटिका व्यवसाय आकारास आणला आहे. पुढे जाऊन ‘लॅंडस्केपिंग’, ‘गार्डनिंग’ क्षेत्रात कौशल्य मिळवले.
Nikita Patil
Nikita Patil Agrowon

अशोक भोईर

Plant Nursery Success Story Business : पालघर हा चिकू. आंबा आदी फळपिके, भात आदींसाठी प्रसिद्ध व काहीसा आदिवासीबहुल जिल्हा आहे. याच जिल्ह्यात गुंदले येथे निकिता पाटील या धडाडीच्या युवतीचे कुटुंब राहते. वडील अविनाश, आई आश्‍विनी, भाऊ अंशुल असे हे चौघांचे कुटुंब आहे.

वडील शेती करतात. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. घरची सुमारे पाच एकर शेती असून, त्यात भातशेतीसह आंबा, नारळ, चिकू आदी पिके आहेत.

अभ्यासक्रमाने दाखवला मार्ग

निकितीने वसई येथून ‘बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ या विषयात पदवी घेतली. पुढे शिकण्याची तिची इच्छा होती. परंतु मध्येच कोविडचा काळ आला. हीच तिच्यासाठी इष्टापत्ती ठरली. या काळात कोसबाड हिल, डहाणू, येथील कृषी विज्ञान केंद्राशी (केव्हीके) तिचा संपर्क आला.
येथे २५ दिवसांचा ‘नर्सरी वर्कर’ या विषयात रोपवाटिका विषयातील अभ्यासक्रम विनाशुल्क चालविण्यात येतो.

निकिताच्या वडिलांनी मुलीला या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. केव्हीकेतील मृदा शास्त्रज्ञ व रोपवाटिका व्यवस्थापनातील तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक भोईर यांचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमास लाभते. यामध्ये कलमांचे प्रकार, रोपांची निगा, खते- पाण्याचे नियोजन, प्रो ट्रेमध्ये भाजीपाला रोपे तयार करणे, झाडांच्या जाती ओळखणे, शोभिवंत झाडांची निवड, निगा व व्यवसायासाठीचा वाव आदी गोष्टींचे प्रशिक्षण निकिताने घेतले.

किडी- रोग नियंत्रण याबाबत केव्हीकेतील उत्तम सहाणे, सिंचन शास्त्र अनुजा दिवटे व विक्री व्यवस्थापनासंबंधी केव्हीकेचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. निकिताने शोभिवंत रोपवाटिकांना भेटी दिल्या. या एकूण अनुभवातून आत्मविश्‍वास वाढला. इथूनच व्यवसायाला खरी सुरुवात झाली.

Nikita Patil
Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

सुरू झाला व्यवसाय

आपल्या पाच एकरांपैकी अर्धा एकरांपासून निकिताने अंशवेल नावाने रोपवाटिका व्यवसाय नव्या उमेदीने सुरू केला. आज तो दीड ते दोन एकरात विस्तारला आहे. सुरुवातीला पुण्याहून काही रोपे आणली. काही स्वतः तयार केली.

या विषयातील ज्ञान व कौशल्य अजून वाढावे यासाठी ‘व्हेजिटेबल मॅनेजमेंट’, ‘ग्रीन हाउस मॅनेजमेंट’ या विषयांवरही प्रशिक्षण घेतले. आज फुलझाडांमध्ये गुलाब, जास्वंद, जाई-जुई, मोगरा, झेंडू, शेवंती अशा वार्षिक व हंगामी फुलांची रोपे ती तयार करते.

फळपिकांमध्ये आंबा, चिकू, पेरू, जांभूळ तर शोभिवंत झाडांमध्ये क्रोटॉन, मनी प्लॅंट, पाम तर मसालेवर्गीय पिकांमध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी, जंगली झाडे अशी विविध प्रकारची
रोपे येथील रोपवाटिकेत तयार होतात.

Nikita Patil
Nursery Management : शास्त्रशुद्ध रोपवाटिका उभारून कृषी क्षेत्राला बळकटी द्यावी

विस्तारला व्यवसाय

अनेक शेतकरी तसेच अन्य ग्राहक निकिताकडून विविध रोपे घेतातच. पण केवळ रोपवाटिकेपुरते निकीता मर्यादित राहिलेली नाही. तर ज्ञान, अनुभव, व्यावसायिक दृष्टिकोन, नवे शिकण्याची व पुढे जाण्याची वृत्ती यांच्या जोरावर याच व्यवसायातील अन्य संधीही तिने शोधल्या. त्यातून उत्पन्नाचे स्रोत तयार केले.

‘लँड डेव्हलपमेंट’, टेरेस व किचन गार्डन, व्हर्टिकल गार्डन, सेंद्रिय शेती, किचन गार्डन, घरचे अंगण, बाल्कनी डेकोरेशन आदींचेही प्रकल्प सध्या ती राबवत आहे. बोईसर- पालघर भागात अनेक औद्योगिक व रासायनिक कंपन्या आहे.

अशी ५ ते ६ कंपन्यांकडील नर्सरी- लॅंडस्केपिंगची जबाबदारी निकिता समर्थपणे सांभाळते आहे. वापी (गुजरात) येथील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीने आपल्या सुमारे २५ एकरांतील ‘गार्डन, लँडस्केपिंगची जबाबदारी तिच्याकडे सोपवली आहे. त्यासाठी निकिताकडे असलेले ज्ञान, सेवा व विश्‍वासार्हता पाहूनच तिची निवड करण्यात आली.

दर आठवड्याला सुमारे ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून ती तेथील व्यवस्थापन समर्थपणे सांभाळते. बोईसर भागातील बांधकाम व्यावसायिक, घरगुती रोपवाटिका यांचीही कामे तिने यशस्वी केली आहेत. निकिता सांगते की काही कंपन्या रासायनिक असल्याने तेथील प्रदूषण कम करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षांचा आढळ वाढण्यासाठी करंज, कडुनिंब आदी देशी झाडांचे संवर्धन व त्यांची निगा करण्यासाठी मियावाकी गार्डन विकसित करण्याचे प्रकल्पही मी स्वीकारले आहेत.

अशोक भोईर, ९६३७७२६२५७
(केव्हीके तज्ज्ञ)

प्रशंसनीय उलाढाल

सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत निकीता गांडूळ खत, व्हर्मिवॉश, किचन वेस्ट कंपोस्ट, जिवामृत, दशपर्णी अर्क आदी निविष्ठा तयार करते. त्यासाठी घरच्या सर्व सदस्यांची तिला मोठी मदत मिळते. रोपवाटिकेत चार ते पाच जणांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. गरजेनुसार बाहेरूनही मजुरांची मदत घेतली जाते.

रोपवाटिका रस्त्यालगत असल्यामुळे तसेच शोभिवंत रोपांची विविधता असल्याने रस्त्यावरून येणारे जाणारे ग्राहकही खरेदी करत असतात. आपल्या एकूण व्यवसायामधून वार्षिक ८ ते १० लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत निकिताने मजल मारली आहे. त्यातून कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार देत घरच्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न तिने केला आहे. निकिताच्या कार्याची दखल घेऊन तिला स्थानिक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

सध्याच्या आधुनिक युगात वेळ व श्रमाची बचत करणारी यंत्रे, विविध तंत्रज्ञान रोपवाटिका व्यवसायात उपलब्ध होत आहे. त्यादृष्टीने युवकांना या क्षेत्रात मोठी संधी आहे.
निकिता पाटील, ८००७६६४७४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com