Fodder Shortage : यंदा चाऱ्याची टंचाई भेडसाविण्याची चिन्हे

Animal Feed : माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत खरिप हंगाम धोक्यात आल्याने चारा टंचाईची समस्या भेडसाविण्याची चिन्हे आहेत.
Dry Fodder
Dry FodderAgrowon
Published on
Updated on

Akola News : आगामी काळात पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याची चणचण उद्‌भविण्याची शक्यता वाढू लागली आहे. ज्वारीसारखे चाऱ्याचे पीक अत्यंत कमी क्षेत्रात लागवड झाल्याने तसेच सोयाबीन व तुरीच्या कुटाराचाही पर्याय कमी झालेला असल्याने टंचाईची निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Dry Fodder
Satara Water Shortage : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यात पाणी टंचाई, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत खरिपात सरासरी क्षेत्राच्या २५ टक्केही ज्वारीची लागवड झालेली नाही. बुलडाणा जिल्ह्याचे ज्वारीचे क्षेत्र १०१९८ हेक्टर असून प्रत्यक्षात २२७७ हेक्टरवर (२१ टक्के) पेरणी झाली. अकोल्याचे सरासरी क्षेत्र ४२७५ असून तुलनेने ६८६ हेक्टर (१६ टक्के) पेरणी, तर वाशीम जिल्ह्यात सरासरी ७५३८ च्या तुलनेत ४०८ (५ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी पावसाची सुरुवात एक महिना उशिराने झाली. परिणामी खरीप ज्वारी लागवडीला ब्रेक लागला.

ज्वारी हे प्रमुख चारा पिकांपैकी एक आहे. मागील काही वर्षात वन्यजिवांच्या त्रासामुळे ज्वारीचा पेरा सातत्याने घटला. आता ज्वारीला चांगला दर मिळत असल्याने खरीप लागवडीकडे थोडा कल पुन्हा निर्माण झाला होता. मात्र, यंदा पुन्हा क्षेत्र घट झाली. लागवड असलेल्या क्षेत्रालाही पावसाचा फटका बसला. ज्वारीची उत्पादकता कमी येऊ शकते. चाऱ्याची उपलब्धता करण्यासाठी शेतकऱ्यांना खरीपातील सोयाबीन, तुरीचे कुटार तसेच रब्बीत हरभरा कुटार, मका पिकावर अवलंबून राहावे लागेल. तुरीचे कुटार काही प्रमाणात चाऱ्यासाठी वापरले जाते. परंतु तुरीचे पीकही सुरुवातीला उधळी लागल्याने ५० टक्कयांवर वाया गेले आहे.

Dry Fodder
Fodder Shortage : मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट

या तीनही जिल्ह्यांचा विचार केल्यास आठ लाखांवर पशुधन आहे. या पशुधनाला मोठ्या प्रमाणात चारा लागतो. आधीच कडबा व कुटार गेल्या काही वर्षांत महागलेले आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात मक्याची २० हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड असल्याने चाऱ्यासाठी या पिकाची व्यवस्था होऊ शकेल. अकोला, वाशीममध्ये मक्याची नगण्य लागवड राहत असल्याने येथे चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना विविध पिकांचा पर्याय शोधावा लागतो. यंदाच्या हंगामात आतापर्यंत पाऊस कमी झाल्याने आगामी रब्बी हंगामसुद्धा कसा राहील याची काहीच शाश्वती नाही. येत्या काळात चांगला पाऊस झाला, प्रकल्पात साठा तयार झाला तर रब्बीत चाऱ्याची व्यवस्था करण्याचा पर्याय मिळू शकतो, असे शेतकरी सांगत आहेत.दुष्काळी परिस्थितीची तीव्रता तितकीशी सध्या जाणवत नसल्याने प्रशासकीय स्तरावर यादृष्टीने कुठलीही तयारी अद्याप झालेली दिसून येत नाही.

मी दीड एकरात विविध हिरवा चारा लागवड केलेला आहे. त्यामध्ये बीएचएन १०, सुपर नेपियर, दशरथ घास, मका आणि सुबाभूळ लागवड आहे. तसेच या व्यतिरिक्त पावसाळी एक एकर केली आणि रब्बीचे एक ते दीड एकर मका लागवड करणार आहे. मका दाणा खुराक म्हणून वापरली जाते तर वाळलेली कुट्टी देखील जनावरांच्या खाद्यात उपयोगी आणत असतो. काही वाळलेला चारा जसे तुरीचे आणि सोयाबीन -हरभऱ्याचे कुटार विकत घ्यावे लागेल. तरच पशुधनाच्या चाऱ्याची सोय होऊ शकेल.
- प्रतीक साबे, शेतकरी, खरबडी, जि. बुलडाणा
खरिपातील सोयाबीनचे कुटार जमा करून ठेवणे तसेच रब्बी हंगामात हरभरा व तुरीचे कुटार जमा करून ठेवणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय असेल ते उन्हाळी चारा पेरणी करतील. जास्त अडचण निर्माण झाल्यास सरकारकडे चारा छावणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे लागू शकतात.
- निंबाजी लखाडे, शेतकरी, खुदनापूर, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com