Fodder Shortage : मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट

Animal feed : पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. मराठवाड्यात ८५ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे माहिती समोर आली आहे.
Fodder
FodderAgrowon
Published on
Updated on

chhatrapati sambhaji nagar : मराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट होण्याच्या मार्गावर आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कृषिमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मराठवाड्यात ८५ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे प्रशासकीय आकडे पुढे आले होते. त्यामधील २० दिवस उलटले असून, पावसाची दांडी कायम असल्याने उपलब्ध व विकतचा चारा पुरवून वापरत चाऱ्याची गरज भागविण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fodder
Fodder Shortage : चारा टंचाईचे संकट गंभीर

मराठवाड्यात ४८ लाख ६१ हजार ४४१ लहान मोठी जनावरे असून, या जनावरांना दरदिवशी २५ हजार ५३७ टन चारा लागतो. ऑगस्टअखेर २१ लाख ७७ हजार २३१ टन चारा उपलब्ध होता. हा चारा किमान ८५ दिवस पुरेल असा प्रशासनाचा कयास होता. त्या वेळी प्रशासनाच्या माहितीनुसार, लहान जनावरास प्रतिदिन ३ किलो व मोठ्या जनावरास ६ किलो मिळून ४८ लाख ६१ हजार ४४१ जनावरांना २५ हजार ५३७ टन चाऱ्याची आवश्‍यकता होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६७ दिवस, जालना ५६ दिवस, परभणी ६१ दिवस, नांदेड ६० दिवस, हिंगोली जिल्ह्यात ६० दिवस चारा पुरेल अशी स्थिती कृषिमंत्र्याच्या बैठकीतून पुढे आली होती.

पावसाने यंदा चांगलीच दडी मारली. कशाबशा पावसावर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक उगवले, पण नंतर दडी मारत अगदीच नगण्य बरसणाऱ्या पावसाने पिकाच्या वाढीवर परिणाम केला. ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद आदी सुका चारा निर्माण करणाऱ्या पिकांवर यंदा मर्यादा आल्या. या पिकांची अपेक्षित पेरणी झालीच नाही. शिवाय दांडी मारलेल्या पावसामुळे भुरे बंधारे वनक्षेत्रातही चाऱ्याची अपेक्षित उपलब्धता झालीच हे स्पष्ट आहे.

वीस गाई आहेत. त्यांना लागणारा चारा खूप काळजी करून वापरला तरी महिनाभर पुरेल दर दिवशी दिल्या जाणाऱ्या चाऱ्यात दहा टक्क्यांपर्यंत घट केली आहे. पीकही हातचे गेले आणि चाराही उपलब्ध नाही.
- प्रवीण राऊत, पोहरेगाव, ता. रेनापूर, जि. लातूर
२०० पेंढी कडबा तीन हजार रुपये प्रति शेकड्याने आणला. जपून वापरला तर पंधरा दिवस कसा बसा पुरेल. पीकही हातचे गेले. आता जनावरांना अर्धपोटी ठेवण्याची वेळ आली.
- तुकाराम अवघड, वाकुळणी, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com