Agriculture Market : मूग, तूर वगळता इतर पिकांच्या भावात नरमाई

Commodity Market Update : या सप्ताहात कापसाचे भाव कमी झाले. मूग व तूर वगळता इतर सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले.
Tur Moong
Tur MoongAgrowon
Published on
Updated on

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १६ ते २२ मार्च, २०२४

MCX मध्ये १९ मार्च पासून कपाशीसाठी २९ नोव्हेंबर २०२४ व २८ फेब्रुवारी २०२५ डिलिवरी व्यवहार सुरू झाले. कापसासाठी मात्र सध्या फक्त २८ मार्च व ३१ मे डिलिवरी व्यवहार सुरू आहेत; पुढील व्यवहार लवकर सुरू होण्याची शक्यता नाही.

रबी पिकांपैकी हरभऱ्याची आवक आता वाढू लागली आहे; १५ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात आवक १२४ हजार टन होती; गेल्या वर्षी सर्वाधिक आवक ३ मार्च २०२३ रोजी झाली होती (१२८ हजार टन). या वर्षी २२ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात हा टप्पा ओलांडला गेला. (१३२ हजार टन). भाव मात्र स्थिर राहिले.

या सप्ताहात कापसाचे भाव कमी झाले. मूग व तूर वगळता इतर सर्वांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. १५ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६१,५८० वर आले होते. या सप्ताहात ते १.५ टक्क्यांनी कमी होऊन रु. ६०,६६० वर आले आहेत. मे फ्युचर्स भाव १.९ टक्क्यानी घसरून रु. ६२,१२० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.४ टक्क्यांनी कमी आहेत. कापसाची आवक कमी होत आहे. फेब्रुवारीपासून कापसाच्या भावात वाढीचा कल आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात २.४ टक्क्यांनी घसरून रु. १,४९८ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,६५६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १०.६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,२३८ वर स्थिर आहेत. फ्युचर्स (एप्रिल) किमती रु. २,२५० वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. २,२७८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.४ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक कमी होत आहे. तर भाव रु. २,२०० ते रु. २,३०० या दरम्यान आहेत.

Tur Moong
Turmeric Farming : युवकाने विकसित केले हळदीचे दर्जेदार वाण

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात ७.३ टक्क्यानी वाढून रु. १६,५३३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. १६,५२८ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १७,४८८ वर आल्या आहेत. जून किमती रु. १८,०१८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ९ टक्क्यांनी जास्त आहेत. ऑगस्ट किमती (रु. १७,५८४) ६.४ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीची आवक वाढत आहे, तर किमतीसुद्धा जानेवारीपासून वाढत आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यानी घसरून रु. ५,६५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याचा पातळीवर स्थिर आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हरभऱ्याचे भाव घसरत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.४ टक्क्यानी वाढून रु. ९,७७५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे, तर भाव डिसेंबरपासून सतत वाढत आहेत.

Tur Moong
Soybean Market : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,६४६ वर आली होती. या सप्ताहात ती १.६ टक्क्यांनी घसरून रु. ४,५४७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय भावात घसरण आहे, तर भारतातील भाव सुद्धा नोव्हेंबर नंतर घसरत आहेत.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,५६५ वर आली होती. या सप्ताहात ती २.२ टक्क्यांनी वाढून रु. ९,७७५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे, तर मागणी चांगली असल्यामुळे नोव्हेंब पासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,६०४ होती; या सप्ताहात ती रु. १,३७५ वर आली आहे. गेल्या तीन महिन्यात कांद्याची आवक स्थिर आहे; किमती मात्र ८ मार्चपासून घसरत आहेत. रबीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,२०० वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,०७५ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com