Sugar Factory : श्री दत्त शेतकरी कारखान्यातर्फे ६० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता वर्ग

Sugarcane FRP : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे २०२४-२५ या गाळप हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला, एफआरपीप्रमाणे दुसरा हप्ता प्रतिटन ६० रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.
Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : शिरोळ, जि. कोल्हापूर ः येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे २०२४-२५ या गाळप हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला, एफआरपीप्रमाणे दुसरा हप्ता प्रतिटन ६० रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

दत्त साखर कारखाना व्यवस्थापनाने उसाचा दुसरा हप्ता दिल्याबद्दल शेतकऱ्यांतर्फे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ या वर्षीचा गाळप हंगाम ९६ दिवस सुरू राहिला. यात १० लाख ७० हजार ७५२ टन ऊस गाळप केला.

Sugar Factory Election
Daund Sugar Factory: ‘दौंड शुगर’कडून पहिला हप्ता प्रति टन २८०० रुपये वर्ग

ऊस गाळपातून ११ लाख ७३ हजार ८१६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. शासनाने जाहीर केलेली उसाची एफआरपी ३१४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा केली होती. तथापि यावर्षी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसामधून साखर उतारा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे.

यामुळे उसाची एफआरपीही वाढत असल्याने साखर उताऱ्यातून मिळणारी अधिकची रक्कम पारदर्शकपणे शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रतिटन ६० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर कारखाना व्यवस्थापनाने वर्ग केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३२०० रुपये मिळाले आहेत.

शिरोळमधील शेतकऱ्यांतर्फे गणपतराव पाटील व कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संचालक दरगू गावडे, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे, प्रगतिशील शेतकरी महादेव बिसुरे, सुभाष पाटील, बाळासाहेब कोळी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com