Nano Urea : युरियाच्या तुटवड्यावर पर्याय नॅनो युरियाचा, तब्बल १७ कोटी बॉटल्सचे उत्पादन

Urea Bag : देशात सर्वाधिक शेतीसाठी रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर केला जातो.
Nano Urea
Nano Ureaagrowon
Published on
Updated on

Urea Indian Market : देशात सर्वाधिक शेतीसाठी रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर केला जातो. सध्या बाजारात निमी कोटेड युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दरम्यान या युरियामध्ये आता विविध प्रकार बाजारात उपलब्द झाले आहेत.

सरकारकडून नवीन उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये नॅनो युरियाद्वारे शेतकऱ्यांना बॉटलमधून युरिया मिळणार आहे. देशात याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने युरियाचा तुटवडा नेहमी भासत असतो.

यावर उपाय म्हणून आता बॉटलचा पर्याय शेतकऱ्यासमोर ठेवण्यात आला आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात बॉटलमधील युरिया बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्द होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित तीन प्रकल्पांतून केंद्र सरकार तब्बल १७ कोटी बॉटलबंद युरियाचे उत्पादन करणार आहे.

देशात सातत्याने युरियाचा तुटवडा भासत असतो याचबरोबर देशात रासायनिक खतांमध्ये युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे केंद्र सरकारला विदेशातून मोठ्या प्रमाणात युरियाची आयात करावी लागते. आगामी काळात युरियाची आयात पूर्णपणे थांबविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने विविध उपाययोजना राबवत आहे.

Nano Urea
PM Kisan : प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता `पीएम किसान`चा लाभ मिळणार

यातीलच एक भाग म्हणून देशात तीन स्वदेशी नॅनो युरिया निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून तब्बल १७ कोटी नॅनो युरिया बॉटल्सची निर्मिती केंद्र सरकार करणार आहे. स्वदेशी नॅनो युरिया निर्मितीचे प्रकल्प गुजरात, उत्तर प्रदेशात उभारण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये कलोल येथे इफ्कोच्या मदतीने बॉटलबंद युरिया निर्मिती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात फुलपूर आणि आंवला येथे दुसरे दोन प्रकल्प उभारलेले आहेत. या तिन्ही प्रकल्पांतील उत्पादन क्षमता ही १७ कोटी बॉटल्स इतकी आहे. एक बॉटल ही ५०० मिलीलिटरची आहे. याच्याच जोडीला गुजरातमध्येच आणंद येथे नॅनो सायन्स् आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अन्य एका वार्षिक ४.५ कोटी बॉटल्स उत्पादनाची घोषणा करण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com