
Indian Sambhajinagar: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांत मागणीच्या तुलनेत पुरवठा झालेल्या एक लाख ४१ हजार ८०२ क्विंटल बियाण्यांपैकी ६५ हजार ७७२ बियाण्यांची विक्री झाली आहे. बियाण्यांची विक्री लक्षात घेता कपाशीला पर्याय म्हणून सोयाबीनकडे वळणारे शेतकरी दरामुळे आता मोठ्या प्रमाणात मक्याकडेही वळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ४५ हजार ३४ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ३१,१९१ हेक्टर क्षेत्रासह जालन्यातील २ लाख १२ हजार १०६ हेक्टर तर बीडमधील सर्वाधिक ३ लाख १ हजार ७३७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
प्रतिहेक्टरी सुमारे ७५ किलो लागणारे व ३५ टक्के बियाणे बदल दरासह सोयाबीन बियाण्यांची २०२२ ते २४ दरम्यान तीन जिल्ह्यांत सरासरी सुमारे १ लाख ३१ हजार २३९ क्विंटल विक्री झाली होती. यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन जिल्ह्यात सुमारे ६ लाख ४२ हजार ६९२ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ८९ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यात २ लाख १९ हजार २९४ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४ हजार ३९८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित सोयाबीन क्षेत्रासाठी सुमारे ४ लाख ८२ हजार २० क्विंटल बियाणे आवश्यक आहे. त्यामध्ये बियाणे बदल दरानुसार १ लाख ६८ हजार ७०७ क्विंटल बियाण्याची गरज असेल.
शिवाय ग्राम बीज उत्पादन मोहीम व शेतकऱ्यांकडे अपेक्षित असलेल्या ४ लाख ९ हजार ५४७ क्विंटल बियाण्यांनी यंदाची गरज पूर्ण होणे अपेक्षित आहे. ३५ टक्के बियाणे बदल दरानुसार आवश्यक असलेल्या एक लाख ६८ हजार ७६० क्विंटल बियाण्यांमध्ये ३०,५४० क्विंटल महाबीज राबिनिकडून ३,५०० क्विंटल, खासगीमधून १ लाख ३४ हजार ६६७ क्विंटल बियाणे अपेक्षित आहे.
बियाणे बदल दरानुसार मागणीपैकी उपलब्ध झालेल्या १ लाख ४१ हजार ८०२ क्विंटल बियाण्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७१२ क्विंटल, जालन्यामध्ये १६,४६० क्विंटल तर बीडमध्ये सर्वाधिक ४८ हजार ६०० क्विंटल सोयाबीन बियाण्यांची विक्री झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
१ लाख ४१ हजार ८०२ क्विंटल बियाणे उपलब्ध
५ जूनपर्यंत तीनही जिल्ह्यात सोयाबीनचे १ लाख ४१ हजार ८०२ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यामध्ये महाबीजकडून १८ हजार ९४४ क्विंटल, राबिनिकडून केवळ ४८ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडील १ लाख २२ हजार ८१० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.