
Shortage Fertilizers Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी कामास वेग आल्याने शेती रिकामी झाल्यानंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, जिल्ह्यात १० : २६ : २६ आणि डी. ए. पी. खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, उसाच्या लागणीला डोस देणे व भरणीच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या पोर्टलवर संयुक्त खताचा एकत्रित साठा दिसतो. मात्र, तुटवडा असलेली खते दिसत नाहीत.
याबाबत जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी सुशांत लव्हटे यांना विचारणा केल्यास ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पोर्टलवर संयुक्त खते एकत्रित १६ हजार ८८३ टन दिसतात. इफको कंपनीचे १०: २६ : २६ खत १ हजार १३० टन, कृभकोचे १० टन उपलब्ध आहे. डी.ए.पी., एम.ओ.पी. खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ठराविक एकाच खताची मागणी करू नये. संयुक्त खतांचा वापर करावा. अशी माहिती लव्हटे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात हंगामामुळे खताची मागणी वाढली आहे. खताच्या १०:२६:२६ मध्ये नत्र, स्फुरद, पालाश असल्यामुळे, युरिया आणि पोटॅश टाकण्याची गरज नसते. यामुळे शेतकऱ्यांतून या खताला मागणी होत आहे. तसेच १८ टक्के नायट्रोजन व ४६ टक्के पालाश असल्यामुळे डी. ए. पी खताला मागणी होत आहे. मात्र, ही खते शॉर्टेज आहेत.
शासनाचे खताची माहिती एकत्र करण्याचे पोर्टल आहे. मात्र, या पोर्टलवर कॉम्प्लेक्स खते एकत्र दिसतात. जिल्ह्यामध्ये संयुक्त खते १६,८८३ टन उपलब्ध दिसतात. किरकोळ विक्रेत्याकडून वेगवेगळ्या खतांची वेगवेगळी आकडेवारी खत उपलब्ध असणे आणि तुटवडा असणारी खते, अशी माहिती एकत्र संकलित केली जात नाही.
यामुळे जिल्ह्यामध्ये गोंधळ असून, खते शिल्लक दिसतात. मात्र, तुटवडा असलेली खते स्वतंत्र दिसत नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.