Fertilizer Shortage : अमरावतीत रासायनिक खतांचा तुटवडा

Chemical Fertilizer : यंदाच्या रब्बी हंगामात रासायनिक खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जिल्ह्यात उपलब्ध खतांचा साठा बघता टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : यंदाच्या रब्बी हंगामात रासायनिक खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जिल्ह्यात उपलब्ध खतांचा साठा बघता टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात डीएपी व एमओपीचा मर्यादित साठा उपलब्ध आहे.

उन्हाळ्यात झालेला अवकाळी पाऊस व जुलै तसे ऑगस्टमधील सततचा पाऊस यामुळे जमिनीत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्याचा फटका सोयाबीनला बसला असला तरी रब्बी हंगामात क्षेत्रवाढ अपेक्षित करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षाही यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून हरभऱ्याखाली तुलनेने क्षेत्रवाढ अपेक्षित करण्यात आली आहे.

Fertilizer Shortage
Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक

गतवर्षी १०८ टक्के क्षेत्र हरभऱ्याखाली होते. रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचीही मागणी वाढणार आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ६०७० टन डीएपी व ३०३२ टन एमओपी खताचा साठा शिल्लक आहे. खतांचा वेळेत पुरवठा न झाल्यास या दोन्ही खतांची टंचाई निर्माण होणार आहे.

रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ४०० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात ११ हजार ५३५ टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले. दरम्यान १४ हजार ३०० टन पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत ९७५६ मेट्रिक टन खताचा पुरवठा झालेला आहे.

Fertilizer Shortage
Fertilizer Shortage : जळगाव जिल्ह्यात खतांची टंचाई कायम

खरीप हंगामातील ६२ हजार ४६८ टन खताचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा झालेला पुरवठा व जिल्ह्यात शिल्लक साठा, असा एकूण ७२ हजार २२४ टन साठा उपलब्ध आहे. त्यातील १० हजार ९९८ टन खताची विक्री झाली असल्याने ६१ हजार २२६ टन साठा शिल्लक असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तथापि डीएपी व एमओपी या खतांचा साठा बघता मागणीच्या तुलनेत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

उपलब्ध साठा (मे.टन)

युरिया ः १६,४३२

डीएपी ः ६,०७०

एमओपी ः ३,०३२

संयुक्त खते ः २३,३३०

एसएसपी ः ९,९७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com