Fertilizer Shortage : जळगाव जिल्ह्यात खतांची टंचाई कायम

Fertilizer Market : खतांच्या वापरात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. खतांची मागणी यंदा वाढणार आहे.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खतांच्या वापरात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. खतांची मागणी यंदा वाढणार आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात युरिया व १०.२६.२६ या खतांची समस्या किंवा टंचाई, लिकींग सुरू आहे.

जिल्ह्यात खतपुरवठा संथ गतीने सुरू आहे. रब्बी हंगाम सुरू झाला आहे. फळ पिकांची लागवड वाढली आहे. खतांचा साठा विविध कंपन्यांनी केला आहे. तसेच कृषी विभागदेखीलखतांचा संरक्षित (बफर) साठा केला आहे. परंतु युरिया व १०.२६.२६ ही खते अपवाद वगळता उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

गेल्या हंगामात खतांची मोठी टंचाई सुरवातीपासून होती. १०.२६.२६, युरिया, दाणेदार सुपर फॉस्फेट ही खते दुरापास्त झाली होती. तशीच स्थिती यंदाही तयार झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दरात ही खते ग्रामीण भागात व शहरातील खत विक्रेत्यांकडे घ्यावी लागत आहेत.

पुरवठा कमी व मागणी अधिक, अशी स्थिती आहे. ही समस्या मागील खरिपात दूर झालीच नव्हती. यंदाही ती तूर होईल की नाही, असा प्रश्न आहे. खतपुरवठादार कंपन्यांकडून खतांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असा दावा मात्र केला जात आहे.

Fertilizer Shortage
Fertilizers Market : अमरावती जिल्ह्यात अनुदानित खतांचा काळाबाजार

जिल्ह्यात हरभरा पेरणी दोन लाख हेक्टरवर असणार आहे. यावर्षी मका पिकाचे क्षेत्रही अधिक राहील. तृणधान्य व गळीतधान्याचे क्षेत्र स्थिर राहणार आहे. तसेच केळी, भाजीपाला पिकांचे क्षेत्रही वाढणार आहे. केळीसह भाजीपाला पिकांना खतांची मोठी आवश्यकता असते. ही मागणी सुरूच आहे. पण पुरवठा विस्कळित आहे.

Fertilizer Shortage
Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीचे पीक

सव्वातीन लाख टन रासायनिक खतांची आवश्यकता

नव्या हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे सव्वातीन लाख टन रासायनिक खतांची आवश्यकता असणार आहे. याबाबतचा पुरवठा लक्ष्यांक कृषी विभागाने मंजूर करून घेतला आहे. यात युरियाचा सुमारे ७० हजार टन पुरवठा होईल. नव्या हंगामासाठी आवश्यक खतांमध्ये मिश्र व सरळ खतांचा पुरवठा सुरू झाला आहे.

त्यात पोटॅश, फॉस्फेटचा पुरवठा झाला आहे. आठवड्यातून काही दिवस विविध कंपन्यांकडून खतपुरवठा होत आहे. फॉस्फेटचीदेखील चांगली मागणी असणार आहे. फॉस्फेटचा हंगामात सुमारे ४० हजार टन पुरवठा होणार आहे, अशी माहिती मिळाली. परंतु युरिया व १०.२६.२६ ची मागणी अधिक आहे. ही खते नसल्याने शेतकरी अन्य मिश्र खतांचा उपयोग करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com