Shiv Rajyabhishek Sohala 2024 : रायगडावर आज होणार शिवराज्याभिषेक सोहळा

Raigad Fort : राज्यभरातील लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगड येथे आज (ता. ६) शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे.
Shivaji Maharaj Jayanti 2024
Shivaji Maharaj Jayanti 2024 Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj : रायगड : राज्यभरातील लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगड येथे आज (ता. ६) शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी या सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज व शहाजी राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलिसांसह सुमारे तीन हजार सरकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्था तसेच नियोजन राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता तब्बल १६ ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात येणार आहेत.

Shivaji Maharaj Jayanti 2024
Shiv Jayanti 2024 : किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा उत्साहात

गडावर येणाऱ्या शिवप्रेमींकरिता वाहने पार्किंग सुविधा, गडावर ये-जा करण्याकरिता एसटी सुविधा, तात्पुरती स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिस सुरक्षा तसेच आरोग्य पथक अशा विविध सरकारी यंत्रणा तयारीला लागल्या आहेत. राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी जिजाऊ यांना अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले.

Shivaji Maharaj Jayanti 2024
Agricultural inputs : कृषी निविष्ठांच्या स्वस्त विक्रीला विरोध

गडावर आज होणारे कार्यक्रम
मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह विविध समाजातील लोक सहभागी होणार आहेत.

आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर होणार आहे. राज नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाईल. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com