Veterinary Digitalization: शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून डिजिटायझेशन

Maharashtra Veterinary College: शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पशुपालकांसाठी ७५ ई-लिफलेट्स संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. तसेच, दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसायिकांसाठी विशेष ॲप्स व पॉडकास्टचा समावेश करण्यात आला आहे.
Digitization
DigitizationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: डिजिटल युगाची चाहूल ओळखत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठअंतर्गत असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ (सातारा) द्वारा त्यांच्या संकेतस्थळावर तब्बल ७५ ई-लिफलेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कागदाचा अपव्यय देखील या माध्यमातून टाळता येणार असून, पर्यावरण रक्षणाचा उद्देशही साधला जाणार आहे.

आता मोबाइलच्या माध्यमातून सर्वच प्रकारचे तंत्रज्ञान एका टचवर उपलब्ध झाले आहे. आवश्‍यक ती माहिती एका टचवर उपलब्ध करुन घेतली जाते. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) अंतर्गत असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाने देखील काळाची पावले ओळखत मोबाइलवर माहिती प्रसारासाठी पुढाकार घेत विस्ताराकामी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरावर भर दिला आहे.

Digitization
Digital ID Farmers : देशातील २.५ कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख पत्र तयार; लोकसभेत केंद्र सरकारची माहिती

शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तार विभाग प्रमुख डॉ. स्मिता कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षाचा ई-रिर्सोस डेव्हल्पमेंट ऑफ डिजिटायझेशन ऑफ एक्‍सटेशन असा प्रकल्प राबविण्यात आला. त्याद्वारे महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर पशुविज्ञान तसेच कुक्‍कुटपालनाविषयक विविध प्रकारची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गरजेच्यावेळी ही माहिती तत्काळ डाउनलोड करून ते वाचता येणार आहे. knpcvs.in असे महाविद्यालयाचे संकेतस्थळ आहे. याच संकेतस्थळावर कुक्‍कुटपालन मार्गदर्शिका तसेच दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन मार्गदर्शिका असे दोन ॲपच्या लिंक देखील आहेत. ॲपचा वापर देखील दुग्ध आणि कुक्‍कुटपालन व्यावसायिकांना रोजच्या व्यवहारात करता येईल.

Digitization
Digital Land Records : स्वामित्व योजनेतून ४ हजार नागरिकांना डिजिटल उतारे

‘माफसू’चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, शिरवळ महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.एस. वासकर यांच्या मार्गदर्शनात डिजिटायझेशन प्रकल्प प्रभावीपणे राबविला जात असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

डिजिटल पर्याय म्हणून २०१५ मध्ये पहिल्यांदा क्‍यू-सॅक यंत्रणा तयार करण्यात आली. त्यानंतर संकेतस्थळावर ई-घडीपत्रिका, ॲपची लिंक आहे. आता सॉप्टीफायवर शेळीपालनाची शाळा या विषयावरील पॉडकास्टचे दहा भाग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. डिजिटल पर्यांयाचा वापर करण्यावर शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.
डॉ. स्मिता कोल्हे, विस्तार विभाग प्रमुख, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्याल, शिरवळ, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com