Digital ID Farmers
Digital ID FarmersAgrowon

Digital ID Farmers : देशातील २.५ कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख पत्र तयार; लोकसभेत केंद्र सरकारची माहिती

Digital ID for 2.5 Crore Farmers : महाराष्ट्रात २२ लाख ५४ हजार, उत्तर प्रदेश १ कोटी २ लाख, मध्यप्रदेशमध्ये ४१ लाख ८७ हजार, गुजरातमध्ये ३६ लाख ३६ हजार, आसाममध्ये १ लाख ४२ हजार तर राजस्थानमध्ये ७५ हजार ५९३ शेतकऱ्यांचे ओळख पत्र तयार करण्यात आले आहे, असंही मंत्री ठाकूर यांनी सांगितलं.
Published on

Digital Agriculture Mission : देशातील २.५ कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल अॅग्रीकल्चर मिशनमध्ये शेतकरी ओळख पत्र तयार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत मंगळवारी (ता.११) लेखी उत्तरात दिली.

डिजिटल अॅग्रीकल्चर मिशन अंतर्गत राज्य शेतकरी नोंदणीमध्ये शेत जमीन असलेले शेतकरी आणि शेतकरी महिलांचा समावेश करण्यात आल्याचं ठाकूर यांनी उत्तरात सांगितलं. तसेच भाडेतत्वार किवा करारावर शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा पर्याय आहे. राज्य सरकारांना यामध्ये शेतकऱ्यांना समावेश करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Digital ID Farmers
Farmer ID : सरकारी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक

मंत्री ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "२ फेब्रुवारीपर्यंत एकूण २ कोटी ५२ लाख २६ हजार ९१२ शेतकऱ्यांची ओळख पत्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात २२ लाख ५४ हजार, उत्तर प्रदेश १ कोटी २ लाख, मध्यप्रदेशमध्ये ४१ लाख ८७ हजार, गुजरातमध्ये ३६ लाख ३६ हजार, आसाममध्ये १ लाख ४२ हजार तर राजस्थानमध्ये ७५ हजार ५९३ शेतकऱ्यांचे ओळख पत्र तयार करण्यात आले आहे." असंही मंत्री ठाकूर यांनी सांगितलं.

उत्तरात पुढे मंत्री ठाकूर यांनी छत्तीसगडमध्ये १४ हजार ३४३ तर ओडिशामध्ये ९ हजार ८४३, तमिळनाडू ३ हजार ५४ आणि आंध्रप्रदेशमध्ये ४२४ तर बिहारमधील १९ शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख पत्र तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

केंद्र सरकारने २ हजार ८१७ कोटी खर्च करून शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसह पीक आधारित माहिती एकतर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

डिजिटल कृषी मिशनमधून शेतकऱ्यांसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रा उभारण्यात येणार आहे. यामध्ये अॅग्रीस्टॅक, कृषि डीसीजन सपोर्ट सिस्टम, कॉम्प्रेहसिव्ह सॉइल फर्टीलिटी आणि प्रोफाई मॅप आदि प्रकल्पातून केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकार यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक पाठिंबा राज्य सरकारांना देत आहे, असंही मंत्री ठाकूर यांनी उत्तरात स्पष्ट केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com