Shetkari Sahitya Sammelan : शेतकरी साहित्य संमेलन आजपासून होणार सुरू

Latest Agriculture News : अकराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनास आजपासून (ता. ४) प्रारंभ होत आहे.
shetkari Sahitya Sammelan
shetkari Sahitya SammelanAgrowon

Nashik News : अकराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनास आजपासून (ता. ४) प्रारंभ होत आहे. मोहाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म प्रांगणात युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे हे संमेलन होत असून त्याचे उद्घाटन आज सकाळी १० वाजता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ लेखक व विचारवंत भानू काळे अध्यक्षस्थानी असतील.

शेती क्षेत्रातील स्थित्यंतरे व शेतीसंबंधी समग्र साहित्याच्या जाणिवा मांडणाऱ्या नवसाहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे हे संमेलन साहित्य रसिकांसाठी अनोखी मेजवानी ठरणार आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, तर कार्याध्यक्ष गंगाधर मुटे हे आहेत.

shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan : नाशिकमध्ये होणार ११ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन

म. रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर,ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sangh Meeting : शेतकरी संघाची पहिलीच बैठक लांबणीव

...असा असेल आजचा दिवस

आज (ता. ४ ) : सकाळी ७ ते ८.३० ग्रंथदिंडी, १० ते दुपारी १ वाजेपर्यंत उद्घाटन सत्र. दुपारी २ ते ३.३० ‘शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन या विषयावर ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचे मार्गदर्शन. ३.३० ते ५ दरम्यान शेतकरी कवी संमेलन. सायंकाळी ५ ते ५.३० ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर व पत्रकार ज्ञानेश उगले घेतील. सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

उद्याचे (ता. ५) कार्यक्रम असे...

प्रारंभी शेतकरी कवी संमेलन. सकाळी १०.३० वाजता स्वानंद बेदरकर हे विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतील. ११ ते १२.३० दरम्यान ‘भारताकडून इंडियाकडे-शेती बदलाचे वारे’ या विषयावर चर्चासत्र, १२.३० ते १.३० दरम्यान शेतकरी गझल मुशायरा, त्यानंतर कथाकथन, लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण आणि अखेर संमेलनाचा समारोप.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com