Shetkari Sahitya Sammelan : नाशिकमध्ये होणार ११ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन

Latest Agriculture News : साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे.
Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan Agrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतकऱ्यांच्या व्यथा, शेती क्षेत्रातील स्थित्यंतरे व शेतीसंबंधी समग्र साहित्याच्या जाणिवा मांडणारे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ४ व ५ मार्च रोजी मोहाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म प्रांगणात युगात्मा शरद जोशी विद्यानगरी येथे होणार आहे. या ११ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे असतील. तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होईल.

सह्याद्री फामर्सचे अध्यक्ष विलास शिंदे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, तर गंगाधर मुटे कार्याध्यक्ष असतील. त्यांनी गुरुवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी आयोजन समितीच्या डॉ. मनीषा रिठे, प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कर्डक आदी उपस्थित होते. संमेलनात वऱ्हाडी कादंबरीकार पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील विशेष अतिथी असतील.

Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Samelan : नाशिकमध्ये होणार ११ वे शेतकरी साहित्य संमेलन

मुटे म्हणाले, ‘‘साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शेतकरी साहित्य संमेलन भरविले जाते. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण वास्तवचित्र आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे.’’

संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन अशी विविधांगी सत्रे असतील. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक भाग घेतील. सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Shetkari Sahitya Sammelan
Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनात राजकारण्यांची भाऊगर्दी; मुख्य कार्यक्रमांना व्यासपीठावर दोनच साहित्यिक

...असे असेल संमेलन

४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत उदघाटन सत्र, दुपारी २ ते ३.३० पर्यंत ‘शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोण’या विषयावर ज्ञानदेव राऊत, विकास पांढरे, मधुसूदन हरणे, डॉ. सुरेश मोहितकर यांचा सहभाग असतील. त्यानंतर शेतकरी कवी संमेलन होईल.

सायंकाळी ५ वाजता ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत होईल. सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ५ मार्च रोजी शेतकरी कवी संमेलन, त्यानंतर सकाळी १०.३० वाजता विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत होईल. त्यांनतर ‘भारताकडून इंडियाकडे’ या विषयावर चर्चासत्र, शेतकरी गझल मुशायरा व लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण होईल.

शेती व शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या व्यासपीठांवरुन मांडल्या जातात, पण या साहित्य संमेलनातून मार्ग दाखवण्यात येईल. शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com