Loksabha Election : ‘शेकाप’ला हव्यात माढा हातकणंगलेच्या जागा

MLA Jayant Patil : माढा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची इंडिया आघाडीकडे ‘शेकाप’ने मागणी केली आहे. येथील लोकांच्या मनात काय आहे, हे मला माहीत आहे.
MLA Jayant Patil
MLA Jayant PatilAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ‘‘माढा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची इंडिया आघाडीकडे ‘शेकाप’ने मागणी केली आहे. येथील लोकांच्या मनात काय आहे, हे मला माहीत आहे. ‘शेकाप’चा कार्यकर्ता जिद्दी असून निष्ठा ठेवणारा आहे. जय पराजय होत असतो. परंतु आम्ही सन्मान सोडत नाही,’’ असे सांगत लोकसभा निवडणुकीतील ‘शेकाप’ची दिशा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. ११) सांगोल्यात बोलताना स्पष्ट केली.

सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकरी मेळावा झाला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, रतनबाई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, बाबूराव गायकवाड, अभिषेक कांबळे, शिवसेनेचे सूर्यकांत घाडगे, तुषार इंगळे, सूरज बनसोडे, दत्तात्रेय टापरे, वैभव केदार आदी उपस्थित होते.

MLA Jayant Patil
Loksabha Election : लोकसभेला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदानासाठी प्रयत्न

आमदार पाटील म्हणाले, ‘‘रोहित पवार यांनी प्रथम २५ वर्षे व्यवसाय केला व त्यानंतर ते आमदार झाले, ते जनतेला कळले पाहिजे. ‘शेकाप’मुळे रामदास आठवले हे खासदार झाले. परंतु भाजपमध्ये जाऊन त्यांनी विचाराला तिलांजली दिली.’’

‘‘‘शेकाप’मध्ये मतभेद असले तरी लोकशाही आहे. तुमच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे, तुमच्या मनाचा आदर मी नक्कीच करणार आहे. परंतु आताच मी उमेदवारीची घोषणा करणार नाही, तर इंडिया आघाडीच्या जागावाटपानंतर तुमच्या मनातील व्यक्तीचा मी निश्चितपणे आदर करेन,’’ असेही पाटील म्हणाले.

MLA Jayant Patil
Irrigation : मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पाणी प्रश्न सुटणार; राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय ?

आमदार पवार म्हणाले, ‘‘कुटुंब फोडणाऱ्या महाशक्तीला ओळखा. या शक्तीने मला जेलमध्ये टाकले तरी मी माझा स्वाभिमान सोडणार नाही.’’ श्री. गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी दत्ता टापरे, सूरज बनसोडे, डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विनायक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

‘‘स्व. आबासाहेबांचे (गणपतराव देशमुख) यांचे कार्य आज सांगण्याची गरज नाही. त्यांनी केलेल्या कामावर, विचारावरच शेकाप पक्ष पुढे जात आहे. कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे हे जनताच ठरवेल. आज कोणी, किती, काय काम केले हे मी सांगणार नाही. मी पक्षाच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता असून जनताच तुमचा निश्‍चितपणे हिशेब करेल,’’ असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या वेळी बोलून दाखविले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com