Loksabha Election : लोकसभेला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदानासाठी प्रयत्न

IAS Kumar Ashirwad :सोलापूर शहरातील रे-नगर गृहनिर्माण संस्थेबरोबरच अन्य गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांचे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
IAS Kumar Ashirwad
IAS Kumar AshirwadAgrowon

Solapur News : यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास ६१ टक्के मतदान झाले होते. मतदानाची ही टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षाही कमी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर शहरातील रे-नगर गृहनिर्माण संस्थेबरोबरच अन्य गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांचे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

मागील निवडणुकीत सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी जवळपास ५३ इतकीच होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत रे-नगर गृहनिर्माण संस्था मतदान टक्केवारी वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवडणूक तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ,

IAS Kumar Ashirwad
IAS Kumar Ashirwad : ‘शासन आपल्या दारी’साठी यंत्रणांनी जबाबदारी पार पाडावी

प्रवीण घम, रे नगर हाउसिंग सोसायटीचे प्रवर्तक नरसय्या आडम, चेअरमन श्रीमती नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख, नरसिंग म्हेत्रे, सुनंदा बल्ला उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात विशेषत: सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीत खूपच कमी होती.

IAS Kumar Ashirwad
Lok Sabha Election : सोलापूर जिल्ह्यात दीड हजार मतदारांसाठी एक केंद्र

सोलापूर शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांचे मतदान होण्यासाठी संबंधित संस्थेच्या चेअरमन व सचिव आणि प्रत्येक सदस्यांचे मतदान कार्ड आहेत का? याची तपासणी करावी, नसतील त्या सदस्यांचे फॉर्म नंबर सहा भरून घेऊन मतदान कार्ड काढावे.

तसेच नव मतदार व अन्य सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या वतीने सर्व सदस्यांना आवाहन करावे. त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यांच्या स्तरावर करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या कार्यात योगदान द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com