Shephard's Security : मेंढपाळांना स्वसरंक्षणासाठी शस्त्रपरवाना देण्याची मागणी

Gun Liverance For Shepfard's : गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यात तीन वेळा व विळद (ता. अहिल्यानगर) येथे एका मेंढपाळावर दरोखोरांनी हल्ला करून लूटमार केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या गुन्ह्यांची पद्धत एकच असल्याचे स्पष्ट होत आहे.
Shephard's Security
Shephard's Security Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यात तीन वेळा व विळद (ता. अहिल्यानगर) येथे एका मेंढपाळावर दरोखोरांनी हल्ला करून लूटमार केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या गुन्ह्यांची पद्धत एकच असल्याचे स्पष्ट होत आहे.

डोंगराळ भागात राहणाऱ्या मेंढपाळांना दरोडेखोरांनी लक्ष्य केले असल्याचे यावरून दिसत असल्याने महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी कायद्याने शस्त्रपरवाना द्यावा, अशी मागणी मेंढपाळ आक्रोश आंदोलनाने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Shephard's Security
Sahyadri Shepherd Community : सह्याद्रीच्या जंगलातले कठीण आयुष्य आणि सगाबाईंची जिद्द

राज्यातील अनेक भागात मेंढपाळ रानोमाळ मेंढीपालनासाठी भटकंती करतात. त्यांच्या मुक्कामही शेतात, डोंगरात असतो. छत्रपती संभाजीनगर जिल्हातील मांजरी (ता. वैजापूर) येथे तीन वेळा मेंढपाळावर दरोडा पडला. अहिल्यानगर तालुक्यातील विळद येथेही काही दिवसांपूर्वी मेंढपाळावर हल्ला करून लूटमार केली. विळद शिवारात मेंढपाळांच्या पालांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज चोरून नेला.

दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही घटनांत गुन्हा करण्याची पद्धत एकच आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मेंढपाळांचा व्यवसाय उपयुक्त आहे. महाराष्ट्रातून मेंढपाळ व्यवसाय संपुष्टात येऊ नये आणि मेंढपाळांवर असलेले भीतीची सावट कायमचे संपविण्यासाठी बंदूक परवान्याची अत्यंत गरज आहे.

Shephard's Security
Shepherds Migration : मेंढपाळ बांधवांचा मुक्काम कायम

महाराष्ट्र सरकारकडून काही एक प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप करत राज्यातील मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मेंढपाळ अक्रोश आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक, नाथ सरक, मुक्ताजी वाघे, एकनाथ कोळपे, भाऊराव सरक, राजू कोळपे, उज्जैन चौगुले, रावसाहेब वर्पे यांनी राम शिंदे यांच्याकडे केली. याबाबत दखल घेतली नाही तर तीव्र अंदोलन करण्याचा तसेच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम दाखवण्याचा इशारा निवेदनात दिला.

पोलीस अधीक्षकांना सूचना

राज्यातील मेंढपाळांना स्व संरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र मेंढपाळ अक्रोश आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून दरोडेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शस्त्र परवाने मिळण्याबाबत लक्ष घालणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com