NCPSP Mandal Yatra : ‘राष्ट्रवादी’ची आता मंडल यात्रा

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणाचे महत्त्व आणि शरद पवार यांचे यामधील मोलाचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणाचे महत्त्व आणि शरद पवार यांचे यामधील मोलाचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नागपुरात झेंडी दाखवत याची सुरुवात होईल, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

चंद्रपूर येथील स्थानिक विश्रामगृहात सोमवारी (ता. २८) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि शहराध्यक्ष बेबी उईके यांच्या उपस्थितीत देशमुख आणि शिंगणे यांनी सांगितले की, ही मंडल यात्रा ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथून निघेल.

Sharad Pawar
Sharad Pawar: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50 टक्के महिला उमेदवार देणार: शरद पवार

भाजपच्या तथाकथित हिंदुत्ववादी अजेंड्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना बाधा पोहोचत आहे. याबाबत ठोस पुरावा देऊन या यात्रेद्वारे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघड केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि महायुती सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. मुख्यमंत्री एक गोष्ट बोलतात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे काही बोलतात, अशी परस्परविरोधी विधाने यामुळे समोर येत आहेत. यातून शेतकऱ्यांची स्पष्ट फसवणूक होत आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

गेल्या दोन वर्षांत ६,१२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ईडी आणि इतर यंत्रणांच्या कारवाया पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. नुकतेच न्यायालयाने केंद्र सरकार आणि ईडीला राजकीय हेतूने प्रेरित कारवाईबाबत फटकारले होते.

राजकीय लढाई मतदार आणि पक्षांना लढू द्या, तुम्ही का राजकीय लढाई लढता ० अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला खडे बोल सुनावले, असेही अनिल देशमुख यांनी याप्रसंगी नमूद केले.

२७० पैकी फक्त ६९ कोटी

शेतकऱ्यांना धान खरेदी चुकारे आणि बोनस मिळालेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात २७० कोटी रुपये बोनसपैकी केवळ ६९ कोटी रुपये दिले गेले आहे. रब्बी हंगामातील धानाच्या ५० कोटी रुपये बोनसपैकी फक्त २० कोटी रुपये मिळाले आहेत.

तसेच, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देण्याचे जाहीर केले होते. परंतु, आता केवळ पंधराशे रुपये दिले जात आहेत. उर्वरित रक्कम कधी मिळणार, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com