Sharad Pawar: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50 टक्के महिला उमेदवार देणार: शरद पवार

NCP Foundation Day: महिलांना निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत 50 टक्के महिला उमेदवार देणार आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News: महिलांना निर्णय प्रक्रियेत समान संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत 50 टक्के महिला उमेदवार देणार आहे. महिलांचे नेतृत्व वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये महिलांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

मुलींना सैन्यात संधी मिळताच त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (शरद पवार गट) वर्धापनदिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

Sharad Pawar
Rain Crop Damage : लोहगाव शिवारात वादळी पावसाचा तडाखा

“राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही महिला सक्षमीकरणासाठी सदैव चांगल काम केले. महिलांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत 50 टक्के महिला उमेदवार देणार आहे.

Sharad Pawar
Tur New Varity : इक्रिसॅटने केलं तुरीचं नवीन वाण विकसित; उष्णतेत तग धरणार

या निर्णयामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार यांनी केलेल्या घोषणेचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वागत झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या महिलांसाठी 33 टक्के आरक्षण आहे,परंतु पवार यांचा 50 टक्के उमेदवार देण्याचा निर्णय हा पुढचे पाऊल मानले जात आहे.

पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, “हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक आहे.या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पक्षाचे कार्यकर्ते पुण्यात आले होते. शरद पवार पुढे म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सामान्य जनतेने संधी दिली. तुमच्यापैकी अनेक जणांना संधी मिळाली.

प्रशासन चालवण्यास सामान्य कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाली तर तो ही कर्तृत्व दाखवू शकतो. त्यासाठी अनेकांची नावे घेता येतील. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल असे कधी वाटले नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

देशहिताचा विचार मांडताना ते पुढे म्हणाले, देशाचा विचार करताना राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. पहलगाममध्ये हत्या झाल्यानंतर राष्ट्रवादीने देशहिताची भूमिका घेतली. शेजारी राष्ट्रासोबत आपले संबंध चांगले राहिले नाहीत. बांगलादेश, श्रीलंका, चीन, पाकिस्तानसोबत  या शेजारी राष्ट्रांसोबत संवाद राहिला नाही, असे पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com