Sharad Pawar : दुधाच्या दराबाबत शरद पवार मैदानात; बुधवारी घेणार दूध उत्पादकांची बैठक

Sharad Pawar Meeting on Milk Price : राज्यातील दुधाचे पडलेल्या दरामुळे दूध उत्पादक चांगलाच अडचणीत आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : राज्यात गेल्या काही दिवसापासून दुधाचे दर सतत पडत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने जाहिर केलेले अनुदान देखील दूध उत्पादकांना मिळत नसल्याने शेतकरी संतापले आहेत. तर राज्य सरकारने दुधाच्या प्रश्नात लक्ष घालवे अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत. मात्र सरकारला दुधाच्या प्रश्नाचे किंवा दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात रस नसल्याचे चित्र सध्या आहे. पण आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनीच यात लक्ष घालण्याचे ठरवले आहे. पवार बुधवारी (ता.२६) दूध उत्पादकांनी संवाद साधणार आहेत.

राज्य सरकारच्या आडमुठे व शेतकरी विरोधी धोरणांमुळे दुधाचे दर कोसळले आहेत. दुधाला अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर राज्यात दुधाचे दर आणि दुधाच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे. मात्र या मागणीवर सरकारकडून कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. उलट दूध उत्पादकांमध्ये रोष वाढत आहे. त्यावरून पवार यांनी दूध उत्पादकांशी चर्चा करण्याचे ठरवले आहे. याबाबत पवार यांनी बुधवारी दूध उत्पादकांची बैठक बोलावली असून दुधाच्या दरात या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर सरकारला निवेदन दिले जाणार आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; आरक्षण, दूध दराच्या बैठकीसाठी आग्रही

याआधी देखील पवार यांनी दुधाच्या दरावरून सरकारला इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहत दूध उत्पादकांना अनुदान द्या अशी मागणी केली होती. तसेच राज्य सरकार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात अपयशी ठरल्याची टीका करताना, दूध उत्पादकांना अनुदान न दिल्यास रस्त्यावर उतरू असे म्हटले होते. तर जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्यातील सरकार बदलणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले होते.

तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जीएसटी कौन्सिलच्या बैठकीवरून रविवारी (ता.२३) केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. कौन्सिलने सर्व दुधाच्या गाड्यांवर १२ टक्के एकसमान दर ठेवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे स्टील, लोखंड, ॲल्युमिनियम, दूध पॅकिंगसाठी जे काही वापरले जाते, त्यावर समान दराने जीएसटी भरावा लागेल. त्यामुळे दूध व्यवसायाला फटका बसणार आहे. यावरून सुळे यांनी, जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीनं कोण गेलं होतं? महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी याचा विरोध का केला नाही? असा सवाल केला आहे. तर संसदेत पहिला शेतकरी प्रश्न, नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय यावरच सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती सुळे यांनी दिली.

Sharad Pawar
Sharad Pawar : "फक्त २ दिवस थांबा, सगळं सरळ करू!"; दुष्काळ प्रश्नावरून शरद पवार यांचा सरकारला इशारा

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात दुधाच्या दरावरून आमदारच आक्रमक झाला आहे. दूध धंदा हा शेतीपूरक व्यवसाय राहिला नसून तो शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय झालेला आहे. मात्र सतत पडणाऱ्या भावामुळे दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देवून त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशा मागणीचे निवेदन आमदार लहू कानडे यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे. यावेळी प्रांताधिकारी वनिता कल्हापुरे यांनी शेतकऱ्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पाठविण्याचे आश्वासन दिले.

तर दिलेल्या निवेदनात, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दुधाला चांगला भाव होता. दुधाला ३८ ते ४० रूपये भाव मिळत होता. मात्र आता महायुतीच्या सरकारमध्ये दूधाचे भाव कोसळले आहेत. दुधाला २४ ते २५ रूपय देखील भाव मित नसल्याचे चित्र आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह शिक्षण आणि लग्नाचे देखील प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com