PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

PM Narendra Modi At Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बागलकोट येथील सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केल्यानंतर सोलापूरच्या सभेतही निशाना साधला. मोदी यांनी काँग्रेसने एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था केल्याचा आरोप केला आहे. 
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon

Pune News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा ज्वर चढला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवार (ता. २९) आणि मंगळवार (ता. ३० रोजी) विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान मोदी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी काँग्रेसह इंडिया आघाडी आणि राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाना साधला आहे. मोदींनी काँग्रेसह इंडिया आघाडीवर तोफ डागताना यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नसून तुम्ही यांच्या हातात देश देणार का असा सवाल उपस्थित जनसमुदायाला केला आहे. तर काँग्रेसने ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था केल्याचा आरोप केला आहे. 

मोदी म्हणाले, "इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये नेतृत्वावरूनच सध्या महायुद्ध सुरू आहे. एवढा मोठा देश नेतृत्व नसणाऱ्या लोकांच्या हातात देऊन कसे चालेल. या आघाडीला नेतृत्व नाही. नेतृत्वाला चेहरा नाही. मात्र यांच्या आघाडीत पंतप्रधान पदासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. याच्यांतील एका पक्षाचा नेता पंतप्रधान पदाची खांडोळी करायला निघाला आहे. तो पाच वर्षात ४ पंतप्रधान झाले तर काय हरकत आहे? असे बोलत आहे. हे विधान नकली शिवसेना असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेत्याकडून केले जात आहे असे मोदी म्हणाले. 

PM Narendra Modi
PM Narendra Modi : मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाला काँग्रेस जबाबदार

संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

तसेच आता फक्त दोनच मतदानाचे टप्पे पार पडले असून काँग्रेस आणि इंडिया आघाडी घाबरली आहे. यातूनच ते सतत खोटे बोलत आहेत. खोट्या गोष्टी पसरवत आहेत. भाजपवाले संविधान बदलतील वर्णभेद लादतील अशा बतावण्या केल्या जात आहेत. मात्र मी आधीच सांगितले आहे, की बाबासाहेबांची इच्छा असली तरी, आम्ही संविधान बदलणार नाही. आम्ही संविधान बदलू शकत नाही, आरक्षण संपवू शकत नाही. यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे देखील मोदींनी म्हटले आहे. 

दोन टप्प्यातील मतदानातच हारले

पुढे मोदी म्हणाले, मी धन, दौलत यश, आणि किर्ती मागण्यासाठी आलो नाही फक्त तुमचा आशिर्वाद मागण्यासाठी आलो आहे. या निवडणुकीत आम्ही पुढील ५ वर्षांच्या विकासाची हमी देत असून तुम्ही तेच निवडाल. पण ज्यांनी २०१४ पूर्वी देशाला दहशतवाद, भ्रष्टाचार आणि कुशासनाच्या दरीत ढकलले त्यांना नाकाराल अशी खात्री आहे. यामुळे काँग्रेसवाले आणि इंडिया आघाडीचे नेते या दोन टप्प्यातील मतदानातच हारले आहेत. 

PM Narendra Modi
Prime Minister Narendra Modi :'काँग्रेस नेत्यांनी पराभव स्वीकारला'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नांदेडमधून हल्लाबोल

६० वर्षांच्या राजवटीत

काँग्रेसने आपल्या ६० वर्षांच्या राजवटीत एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था केली असा आरोप मोदीं यावेळी केला. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात एससी/एसटी/ओबीसी यांच्यात बदल करण्याठी काहीच केले नाही. उलट ते संकटात राहू दे, ते दुःखात राहू दे अशीच धोरणे राबवली. मात्र मी त्यांच्यात सुधारणा व्हाव्यात यासाठी प्राधान्य दिले. १० वर्षात आम्ही गरीबांच्या कल्याणासाठी योजना आखल्या. ज्या सर्वांसाठी आहेत.  

आमच्याकडे व्हिजन आहे

या इंडिया आघाडीच्या लोकांकडे कोणताच अजेंडा नसून फक्त मोदीला वेळोवेळी शिवीगाळ करणे हाच यांचा एकच अजेंडा राहिला आहे. यांच्याकडे व्हिजन नाही. आमच्याकडे व्हिजन आहे. आम्ही ते राबवू. यासाठी आम्ही आमचे आयुष्य कामी घालवू असेही मोदी यांनी म्हटले आहे.

वसुली टोळी

यादरम्यान मोदी यांनी कर्नाटकमधील बागलकोट येथील निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना, काँग्रेस राज्यात खंडणीखोर टोळी चालवत आहे असा आरोप केला. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार चालवत नाही तर ‘वसुली टोळी’ चालवत आहे. काँग्रेसने कर्नाटकाचे टेक हब हे नाव बदलून आता  'टँकर हब' केले आहे. काँग्रेस आता २जी घोटाळ्यासारख्या नवीन घोटाळ्याची स्वप्ने पाहत आहे असा टोला मोदी यांनी लगावला आहे. 

महाराष्ट्रात ६ सभा 

दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीने राजकीय तापमान चांगलेच तापलेले आहे. यावेळी  मोदी  यांच्या महाराष्ट्रात ६ सभा होणार आहेत. सोमवारी दुपारी सोलापूर येथील सभा पार पडली असून कराड आणि पुण्यात सभा होणार आहेत. तर मंगळवारी लातूर, माळशिरस, धाराशिवला सभा होतील. कराडमध्ये सोमवारी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा होणार आहेत. तर मंगळवारी मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com