Shahu Maharaj Jayanti: शाहू महाराज यांचे काम देशाला दिशा देणारे: प्रकाश आबिटकर

Health Minister Prakash Abitkar: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या कोल्हापूरचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शाहू जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले.
Shahu Maharaj Jayanti
Shahu Maharaj JayantiAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची व कामांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव अधिक उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Shahu Maharaj Jayanti
Rajarshi Shahu Maharaj Donation : राजर्षि शाहू महाराजांच्या देणगीच्या ऐतिहासिक आज्ञापत्राचे अनावरण

शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी शाहू जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की देशाला दिशा देणारे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या जन्मस्थळाबाबत अजून जे जे आवश्यक आहे, ते करण्यासाठी सर्व मिळून कर्तव्याची व भूमिकेची जबाबदारी घेऊन करू. या ठिकाणच्या विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही योगदान दिले आहे.

Shahu Maharaj Jayanti
Shahu Maharaj Governance: छत्रपती शाहू महाराजांचा शासनव्यवहार

यापुढेही आम्ही सर्वजण मिळून जन्मस्थळ विकासासाठी कार्य करू. येत्या काळात अधिवेशन झाल्यावर एक बैठक घेऊन सर्व संघटना, समित्यांच्या सूचना व त्यांचे म्हणणे विचारात घेऊन कामांची दिशा ठरवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com