
Otur News : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील धरणातून कालव्याला आवर्तन सुरू आहे. कालव्यातून डिंगोरे गावच्या हद्दीत लाखो लिटर पाण्याची पाझरामुळे गळती होत आहे. या पाण्यामुळे कालव्या लगतच्या पिकांना फटका बसत आहे.
पिंपळगाव जोगा कालव्यात ठिकठिकाणी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. अस्तरीकरण ठिकठिकाणी उखडल्याने व पाझरामुळे या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर गळती वाढली आहे. ऐन थंडीत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्याच्या पाझरामुळे कालव्या लगतची हजारो एकर शेतीतील पिके धोक्यात आली आहेत.
त्यामुळे कालव्यातील पाण्याचा विसर्ग थांबून जोपर्यंत कालव्याचे नव्याने अस्तरीकरण होत नाही, तोपर्यंत कालव्याला पाणी सोडू नये, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. कालव्याच्या डागडुजीसाठी कुकडी पाटबंधारे विभाग उदासीन दिसत आहे. तसेच या पाण्यामुळे कालव्या लगतची हजारो एकर शेतीतील पिके वयाची भीती निर्माण झाली आहे.
कुकडी प्रकल्पांअतर्गत पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यामुळे जुन्नर, पारनेर तालुक्यांतील जिरायती शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सुमारे ७१ किलोमीटर लांबीचा असणारा हा कालवा शेतकरी वर्गासाठी वरदान ठरला आहे.
मात्र, या कालव्याचे ठिकठिकाणी अस्तरीकरण उखडल्याने पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून होणाऱ्या अवर्तनावेळी मागील काही वर्षांपासून कालव्यातून होणाऱ्या पाझरामुळे व गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय वाढला आहे. या कालव्याच्या कामाला सुमारे चौदा ते पंधरा वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे.
पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचे नव्याने अस्तरीकरण करावे, तसेच गळतीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पिंपळगाव ते ओतूरपर्यंत बंदिस्त पाइपलाइनने पाणी न्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने अंकुश आमले व बबन तांबे यांनी केली आहे.
पाण्याचे आवर्तन बंद करून नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी बबन तांबे, अंकुश आमले, डिगोरे उपसरपंच नीलेश लोहोटे, अंकुश थापेकर, संदीप शिंगोटे, अनिल शेरकर, सुनील शेरकर, संतोष शेरकर, रूपेश डुंबरे, भाऊ इंस्काडे, संदीप नेरकर, समीर शेरकर, शप्पी मोमीन, सुनील उकिर्डे, नवनाथ नेरकर, अक्षय शेरकर, बाळासाहेब थापेकर, रंजन शेरकर, शिवाजी शेरकर, मंगेश डुंबरे, बबन थापेकर, शंकर सुकाळे यांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा
पिंपळगाव जोगा धरण कालव्यास डिंगोरे, उदापूर, ओतूर आदी ठिकाणी गळती होत आहे. पिंपळगाव जोगापासून ओतूरपर्यंत मोठी बंदिस्त पाइपलाइन करावी. तसेच त्वरित कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा पिंपळगाव जोगा, डिंगोरे, ओतूर येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या विरुद्ध आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.