Loksabha Election : शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष लोकसभेत अलिप्त राहणार

Anil Ghanwat : भाजप उमेदवाराला समोर जो उमेदवार हरवेल अशाला मतदान करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत ठरला असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी सांगितले.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Nagar News : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्वच पक्षांनी शेतकरी हित जपले नाही. त्यामुळे शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष कोणत्याही पक्षाला समर्थन देत नाही. मात्र भाजपचा दहा वर्षांचा काळ शेती, शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी घातक ठरलेला आहे. त्यामुळे सध्या भाजपचा पराभव करणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भाजप उमेदवाराला समोर जो उमेदवार हरवेल अशाला मतदान करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत ठरला असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी सांगितले.

नगर येथे बोलताना घनवट म्हणाले, की शेतकरी देशाचा कणा आहे, मात्र कायम शेतकऱ्यांची सत्ताधाऱ्यांकडून अवहेलना झाली आहे. शेतीमाल साठा मर्यादा केलेली आहे. कांदा, गहू, साखर, तेलबिया, कडधान्य यांसारख्या वस्तूंवर निर्यातबंदी केली. गरज नसतानाही अनेक वेळा शेतीमाल आयात करून भारतातील शेतीमालाचे दर पाडलेले आहेत. मुळात सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे.

Loksabha Election
Loksabha Election Boycott : बाळगंगा धरणग्रस्‍तांचा मतदानावर बहिष्‍कार!

सरकारी निधीचा गैरवापर होत असून त्यातून राजकीय गुन्हेगारीकरण वाढत आहे. आज सत्तेवर असणारे ५० टक्के नेते गंभीर गुन्ह्यातील आहेत. लोकशाही राष्ट्रात विरोधी पक्ष मजबूत असणे गरजेचे आहे. मात्र सत्ताधारी सत्ता, पैसा आणि सरकारी यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना संपण्याचे काम करत आहे. राज्यात विरोधी पक्ष फोडण्याचे काम केले हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष कमकुवत करणे चांगले नाही.

आम आदमी पार्टीसारख्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या पक्षाचा प्रमुखाला जेलमध्ये टाकता. लोकशाहीचे हनन करणाऱ्या भाजपसारखा पक्ष सत्तेत येणे समाज, शेतकरी यांच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे पाठिंबा कोणाला द्यायचा हा प्रश्‍न आहे. भाजप विरोधात लढणारेही फारसे सक्षम आहेत असे नाही.

Loksabha Election
Lok Sabha Election 2024 Maharashtra : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला, संयुक्त पत्रकार परिषदेत यादी जाहीर

त्यांचेही धोरण खुप काही चांगले नाही. त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याची परिस्थिती नाही. सगळ्याचे धोरण एकच आहे. सत्तेत यायचे आणि पैसा कमवायचा हेच धोरण आहे. हे लोक निवडून आल्यावर भाजपमध्ये जातात. त्यामुळे शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष या निवडणुकीत कोणालाही पाठिंबा देणार नाही.

विधानसभेला ताकद लावू

अनिल घनवट म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाने अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत ताकद लावणार आहोत. शेतकरी संघटनेचा प्रभाव असलेल्या राज्यातील प्रमुख मतदार संघात उमेदवार उभे करणार आहोत. कोणत्या पक्षाशी युती करायची का याबाबत सध्या तरी चर्चा झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com