Majhi Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’साठी ग्रामीण भागातून पावणेदोन लाख अर्ज

Application Update : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक लाख ७५ हजार ६६१ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत.
Ladki Bahin Scheme
Ladki Bahin SchemeAgrowon
Published on
Updated on

Nanded News : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक लाख ७५ हजार ६६१ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये शिबिर लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Ladki Bahin Scheme
Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’वर भामट्यांची वक्रदृष्टी

जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना अर्ज भरण्याची संधी मिळणार असून, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रत्येक गावात कॅम्पचे आयोजन आले आहे. जास्तीत-जास्त महिलांनी योजनेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

Ladki Bahin Scheme
Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी एक लाख ३४ हजार अर्ज

उमरी तालुक्यातील दुर्गानगर तांडा येथे मीनल करनवाल यांनी अंगणवाडीस भेट दिली. योजनेबाबत महिला व ग्रामस्थांना त्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. महिलांनी अर्ज भरताना आधार कार्डनुसार माहिती भरावी. नारीशक्तीदूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच अर्जात लिहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

तालुकानिहाय अर्जांची संख्या

अर्धापूर १२९४८

भोकर ७२५४

बिलोली १४०८३

देगलूर १२६००

धर्माबाद ५६६४

हदगाव ११७४२

हिमायतनगर ५२०८

कंधार १३४१८

किनवट १३२४४

लोहा १००२९

माहूर १५४२२

मुदखेड १०५५०

मुखेड १७८९७

नायगाव १०८५७

नांदेड ९१५७

उमरी ५५८८

ऑनलाइन

१ लाख १०,४४९

ऑफलाइन

५,११२ अर्ज प्राप्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com