Agriculture Warehouse : सात सहकारी संस्था उभारणार गोदाम

Grain Storage : तीन वर्षांपासून नफ्यात असलेल्या सोसायट्यांशी सात वर्षांसाठी करार करून त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर धान्य साठवण गोदाम उभे करण्यात येतील.
Agriculture Warehouse
Agriculture WarehouseAgrowon
Published on
Updated on

Nashik News : धान्य साठवण योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध तालुक्यांत सात सहकारी संस्थांमार्फत गोदाम उभारण्यात येणार आहेत. नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झुमर्स फेडरेशन (एनसीसीएफ) सोबत सात वर्षांचा करार केला असून, लवकरच गोदाम उभारणीचे काम सुरू होईल. येत्या काळात हजार विविध कार्यकारी सहकारी संस्थांना धान्य गोदाम योजनेसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

धान साठवण योजनेअंतर्गत गोदाम उभारण्यासाठी विविध कार्यकारी संस्था आणि ‘एनसीसीएफ’ यांच्यातील बैठक मंगळवारी (ता. २६) जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यालयात झाली. ‘एनसीसीएफ’चे प्रकल्प व्यवस्थापक तपसकुमार राय, सहकार विभागाचे अधिकारी प्रदीप महाजन, योजनेचे अमंलबजावणी अधिकारी (मुंबई) येथील अॅग्रीबिड प्रायव्हेट कंपनीचे असोसिएट डायरेक्टर किशोर महाले यांच्यासह विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापक उपस्थित होते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

भारत सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १२ हजार ५००, तर नाशिक जिल्ह्यातील ६१४ सोसायट्यांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. तीन वर्षांपासून नफ्यात असलेल्या सोसायट्यांशी सात वर्षांसाठी करार करून त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर धान्य साठवण गोदाम उभे करण्यात येतील. प्रत्येक गोदामाचा प्रोजेक्ट दोन कोटींचा असून, त्यासाठी ३३ टक्के अनुदानही देण्यात येणार आहे.

गोदामात ‘एनसीसीएफ’ स्वतः खरेदी केलेले धान्य ठेवणार असून, खासगी संस्थांनाही साठवणीसाठी गोदाम देण्यात येतील. ‘एनसीसीएफ’शी करार झाल्यानंतर तयार मॉडेलनुसार ‘एनबीसीसी’ ही संस्था कन्स्ट्रक्शन पूर्ण करेल. सात संस्थांशी लवकरच करारनामा पूर्ण होणार आहे, तर २२ प्रस्ताव विचाराधीन असल्याचे तपसकुमार राय यांनी सांगितले.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : शास्त्रीय पद्धतीने गोदाम बांधकामाचे नियोजन

धान्याची नासाडी टळेल

राज्य सहकारी बँकेकडून प्रकल्प उभारण्यास एक टक्का व्याजदारावर कर्ज देण्यात येणार आहे. कांदाचाळींप्रमाणेच या गोदामांची उभारणी करण्यात येईल. यात विविध प्रकारच्या डाळींपासून टिकणारा माल, कांदा आणि माल साठवण करता येईल. त्यामुळे दर वर्षी नुकसान होणाऱ्या कोट्यवधी टनाच्या धान्याची बचत होणार आहे.

या संस्थांबरोबर झाला करार

 बाणगाव विविध सहकारी संस्था, नांदगाव

 नामपूर गृहविकास संस्था, सटाणा

 पाटणे विकास सहकारी संस्था, मालेगाव

 देवळा पूर्व सहकारी संस्था, देवळा

 रामेश्‍वर विकास संस्था, देवळा

 वाडगाव गिरणारे विकास संस्था, नाशिक

 चांदवड विकास सहकारी संस्था, चांदवड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com