Soybean Pest infestation : सोयाबीनवर पाने, शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Agricultural Pests : नांदेड जिल्ह्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांवर कीडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सोयाबीनवर पाने तसेच शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
Pest Control
Pest ControlAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात सध्या पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांवर कीडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सोयाबीनवर पाने तसेच शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कपाशीवरही रसशोषण करणाऱ्या कीडींचे प्रमाण अधीक दिसून येत आहे. यासाठी शेतकरी कीडनाशकांची फवारणी करत आहेत. परंतु या कीडी कीटकनाशकांनाही प्रतिसाद देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नांदेड जिल्ह्यात मागील महिना-दीड महिन्यापासून पावसाने संततधार हजेरी लावली आहे. या पावसामुळे वखरणी, कोळपणी, निदंणी अशी आंतरमशागतीची कामे ठप्प झाली होती. परिणामी पिकांत तण वाढले, तसेच कीडी व रोगांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला. सोयाबीनवर पाने खाणारी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे.

Pest Control
Soybean Pest Control: सोयाबीनवरील केसाळ अळी नियंत्रणासाठी उपाय

अळीचे प्रमाण अधिक असल्याने एका दिवसात सोयाबीनच्या शेंगा या अळ्या फस्त करीत आहेत. यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके फवारत आहेत. पंरतु या अशांचा बंदोबस्त होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. याबरोबरच कपशीवरही रस शोषणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यामुळे कपाशीची पाने पिवळी, लाल पडून ते गळून पडत आहेत.

Pest Control
Soybean Disease, Pest Control : सोयाबीनवरिल सध्याच्या किड, रोगावर तज्ज्ञांचा सल्ला

यासाठी शेतकरी कीडनाशकाची फवारणी करत आहेत. तसेच सततच्या पावसामुळेही कपाशीची झाडे उन्मळून पडत आहेत. मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी कपाशी, सोयाबीन, तूर, हळद या पिकांवर कीड व रोगांच्या बंदोबस्तासाठी फवारणीची कामे करत आहेत. तर काही शेतकरी निदंणी, वखरणी यासारखी आंतरमशागतीच्या कामात व्यग्र आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी या पिकांवरील कीडी व रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा उपयोग करावा, कीड, रोगासंदर्भात कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. कीडनाशकांबरोबरच निंबोळी अर्काचा वापर करावा. यासोबतच कामगंध सापळ्यांचाही वापर करावा.
भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com