Soybean Production : सुधारित तंत्राच्या वापरातून सोयाबीन उत्पादनात वाढ

Soybean Farming : सातारा जिल्ह्यातील महागाव येथील विशाल चव्हाण या युवा शेतकऱ्याने सुधारित तंत्राद्वारे सोयाबीनची शेती यशस्वी केली आहे. बीजोत्पादनावर भर देत एकरी १७ ते २२ क्विंटलपर्यंत उत्पादनाची क्षमता त्यांनी गाठली आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सातारा शहरालगत रेल्वे स्टेशन असलेले महागाव हे ऊस पिकासाठी प्रसिद्ध आहे. पाण्याची मुबलक सोय असल्याने ऊसक्षेत्र वाढीस मदत मिळाली. नवनाथ भानुदास चव्हाण हे गावातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांना रोहित, विशाल, सुजित ही मुले आहेत. मोठे रोहित ट्रॅक्टर व्यवसाय, धाकटे सुजित ट्रक व्यवसाय तर मधले बंधू विशाल शेतीची जबाबदारी सांभाळतात.

वडील पूर्णवेळ शेती करीत असताना मुलांचीही मदत व्हायची. विशाल यांनी एमएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची सर्व जबाबदारी घेतली. कुटुंबाची साडेबारा एकर शेती असून सर्व बागायती आहे. यात सर्वाधिक ऊस घेण्यात येतो. ऊस तुटण्यास होणारा विलंब तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे ऊस क्षेत्र कमी केले.

दरम्यानच्या काळात कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ संपर्कात आले. त्यांच्याकडून सुधारित तंत्र पद्धतीने सोयाबीन शेतीसाठी मार्गदर्शन झाले. त्याचा अवलंब करीत चव्हाण कुटुंब २०१८ मध्ये फुले संगम वाणाचे दोन एकरांत एकरी दहा क्विंटल या प्रमाणात उत्पादन घेण्यात यशस्वी झाले. त्यानंतर या पिकात हळूहळू हातखंडा तयार होऊ लागला. अलीकडील काळात सोयाबीनची उत्पादकता उच्च पातळीपर्यंत नेण्यापर्यंत हे कुटुंब यशस्वी ठरले आहे.

सोयाबीन व्यवस्थापन तंत्र- ठळक बाबी

दरवर्षी सुयोग्य पद्धतीने बीजोत्पादन. त्यातून दर्जेदार बियाणे निर्मिती.

नऊ ते दहा एकरांत लागवड. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून (राहुरी) केडीएस ९९२ (फुले दुर्वा), केडीएस ७५३ (फुले किमया), फुले संगम हे वाण घेतले जातात.

लागवडीपूर्वी हिरवळीची पिके घेतली जातात.

मेच्या अखेरीस बीबीएफ यंत्राद्वारे गादीवाफे (बेड) सोडले जातात. यामुळे बेडच्या दोन्ही बाजूंना सरी तयार होते. बेडवर दोन झाडांतील अंतर सात इंच राहील अशी टोकणी मजुरांकरवी केली जाते. या पद्धतीसाठी १० ते १२ किलो बियाणे एकरी लागते.

जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया करण्यात येते. उगवणीपूर्व तणनाशकाचा वापर होतो.

Agriculture Technology
Soybean Production: सोयाबीनचे विभागानुसार महत्वाचे वाण?

एकरी डीएपी ५० किलो, पोटॅश २५ किलो व गंधक १० किलो असा सुरुवातीचा डोस ठेवला जातो.

किडी-रोगांचे निरिक्षण करून गरजेनुसार किंवा दर १५ दिवसांनी कीडनाशकांची फवारणी होते. चिकट सापळ्य़ांचाही वापर होतो.

बियाणे प्लॅाट घेतले जात असल्याने शेंगा आल्यावर ०-०- ५० या खताची फवारणी केली जाते.

सुधारित तंत्राचा वापर केल्याने बियाणे व अन्य खर्चात मोठी बचत होते.

सूर्यप्रकाश भरपूर व योग्य प्रमाणात मिळाल्याने पिकाची वाढ एकसारखी होते.

फुटव्यांची संख्या जास्त येत असल्याने शेंगांचे प्रमाण चांगले मिळते.

सापळ्यांमुळे कीटकनाशकांवरील खर्च प्रमाणात राहतो.

फवारणीसाठी ड्रोनचाही वापर केला आहे.

Agriculture Technology
Soybean Farming : खेडमध्ये सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती

उत्पादन व बियाणे विक्री

एकरी १७ ते २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रति किलो १०० ते १५० रुपयांपर्यंत दर बियाणे विक्रीतून मिळतो. मशागत ते काढणी, मळणी, पॅकिंग, ब्रॅडिंगपर्यत किमान ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. खर्च वजा जाता चांगल्या प्रकारे नफा हाती येतो. विशाल यांनी मित्रांच्या मदतीने कृषिधन स्वयंसाह्यता गटाची स्थापना केली आहे. यात १६ सदस्य असून कृषिधन नावाने बियाण्याचे ब्रॅडिंग, पॅकिंग केले जाते. मागील वर्षी गटातर्फे १२०० बॅगांची विक्री झाली. यात विशाल यांच्याकडील तीनशे बॅगांचा समावेश आहे.

प्रगतिशील शेती

सोयाबीनसह घेवडा हे पीकही विशाल खरीप व रब्बी हंगामात घेतात. सोयाबीनच्या ‘रोटेशन’ साठी ते फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात. यंदाच्या खरिपात फुले राजमा या वाणाची दोन एकरांत लागवड केली आहे. रब्बी घेवड्यात वरुण, फुले विराज या वाणांचा ते वापर करतात.दरवर्षी एक एकर ऊस बियाणे प्लॅाट घेतात. पूर्वी को ८६०३२ हे वाण ते घेत. मात्र परिसरात गूळ कारखाना तयार झाल्याने पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून १४०१२, ११०१५ हे वाण घेऊन लागवड केली आहे. दोन ट्रॅक्टर्स, बीबीएफ यंत्र, पल्टी नांगर, फणपाळी, पाचट कुट्टी, खोडवा कटर, मळणी यंत्र आदी यंत्रे घेतली आहेत.

मदत, मार्गदर्शन : आई, वडील तसेच दोन्ही बंधूंची शेतीत मदत होते. कृषी सहायक धनाजी फडतरे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. महेश बाबर, शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांचे मार्गदर्शन मिळते. ॲग्रोवनचे नियमित वाचन करीत असल्याचाही फायदा होतो असे विशाल सांगतात.

विशाल चव्हाण

९९२३८४१७१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com