IFFCO Election : गुजरातचे दिलीप संघानी यांची इफकोच्या अध्यक्षपदी निवड 

BJP leader Dilip Sanghani : भाजपचे दिग्गज नेते दिलीप संघानी हे मूळचे गुजरात अमरेली जिल्ह्यातील असून त्यांनी त्यांना २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पचवावा लागला होता. पण आता त्यांनी इफ्कोची निवडणूक जिंकलेली आहे. 
IFFCO Election
IFFCO ElectionAgrowon

Pune News : भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप संघानी यांना इफ्कोच्या निवडणुकीतून दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल लागला. शुक्रवारी इफ्कोच्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. संघानी हे मूळचे अमरेली जिल्ह्यातील असून ते भाजपचे माजी खासदार आणि गुजरातमधील कृषी आणि सहकारासह अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत.

इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने शुक्रवारी त्यांच्या संचालक मंडळासाठी १५ व्या आमसभेच्या निवडणुका घेतल्या. इफ्को सदन, नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या या निवडणुकीत गुजरातचे दिलीप संघानी यांची अध्यक्षपदी तर बलवीर सिंग यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सहकारी मूल्ये आणि तत्त्वांना महत्त्व देऊन देशभरातील सहकार क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासावर संचालक मंडळाने विश्वास व्यक्त केला आहे. इफ्को ही जगातील शीर्ष ३०० सहकारी संस्थांमध्ये प्रथम क्रमांकाची सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते.

IFFCO Election
IFFCO fertilizer : चीनमधून आयात आणि आत्मन‍िर्भर भारत... इफ्कोच्या विरोधात का सुरू झाले कॅम्पेन?

जगदीप सिंग नकाई, उमेश त्रिपाठी, प्रल्हाद सिंग, बलवीर सिंग, रामनिवास गढवाल, जयेशभाई व्ही राडाडिया, ऋषिराज सिंग सिसोदिया, विवेक बिपिनदादा कोल्हे, सिमाचल पाधी इफ्को कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली येथे ९ मे २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीत २१ जागांसाठी, के श्रीनिवास गौडा, एस शक्तिकवेल आणि प्रेम चंद्र मुन्शी हे त्यांच्या संबंधित मतदारसंघातून संचालक मंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले. तसेच डॉ.वर्षा एल कस्तुरकर, दिलीप संघानी, सुधांश पंत, आलोक कुमार सिंग, जे. गणेशन, एमएन राजेंद्र कुमार, पीपी नागी रेड्डी, बाल्मिकी त्रिपाठी आणि मारा गंगा रेड्डी यांचीही आपापल्या मतदारसंघातून संचालक मंडळ म्हणून निवड झाली आहे.

३६,००० सदस्य सहभागी?

यंदाच्या मार्चमध्ये इफ्को निवडणूक जाहिर झाली. या निवडणुकीसाठी ३६,००० हून अधिक सदस्य, सहकारी संस्थांसह सहभागी झाल्या. ही गुंतागुंतीची प्रक्रिया दोन महिने चालली. इफकोमध्ये नवीन निवडणूक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यात वैयक्तिक उपस्थिती न लावता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सोय करण्यात आली होती

IFFCO Election
Iffco Kisan Drone : नॅनो खतांच्या फवारणीसाठी इफको करणार २५०० किसान ड्रोनची खरेदी

संघानी सहकारी नेते 

इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.उदयशंकर अवस्थी म्हणाले की, निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडल्या. समितीच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप संघानी, उपाध्यक्ष बलवीर सिंग व संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांचे अवस्थी यांनी अभिनंदन केले. 

तसेच निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी सर्व सहकारी संस्था आणि मतदारांचे आभार मानले. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृषी सुधार समितीचे सदस्य विनोद आनंद यांनी संघानी यांच्या इफ्कोच्या अध्यक्षपदी निवडीचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, संघानी हे नावाजलेले सहकार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली इफ्को केवळ पुढेच जाणार नाही तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मोठा भागीदार बनेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com