‘इफ्को’च्या नॅनो युरियाची  होणार परदेशात निर्यात 

केंद्र सरकारच्या रसायने आणि खत मंत्रालयाने इंडियन फार्मस फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफ्को) उत्पादित केलेल्या नॅनो युरियाच्या निर्यातीला मान्यता दिली आहे.
‘इफ्को’च्या नॅनो युरियाची  होणार परदेशात निर्यात  IFFCO's Nano Urea Will be exported abroad
‘इफ्को’च्या नॅनो युरियाची  होणार परदेशात निर्यात  IFFCO's Nano Urea Will be exported abroad

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या रसायने आणि खत मंत्रालयाने इंडियन फार्मस फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफ्को) उत्पादित केलेल्या नॅनो युरियाच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. इफ्कोच्या गुजरातमधील कांडला बंदरात असणाऱ्या प्रकल्पातून सध्या नॅनो युरियाची निर्मिती केली जात आहे.  या बाबत माहिती देताना इफ्कोचे कार्यकारी संचालक डॉ. यू. एस. अवस्थी म्हणाले, ‘‘आम्ही जगभरातील शेतकऱ्यांसाठी नॅनो युरियाची निर्मिती केली आहे. नॅनो युरिया जगभरातील शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध आहे. नॅनो युरियाच्या वापरामुळे शाश्‍वत शेती आणि पर्यावरणाच्या रक्षणाला मोठी दिशा मिळणार आहे.’’  या बाबत बोलताना रसायने आणि खते मंत्रालयाचे अधिकारी निरंजन लाल यांनी मंत्रालयाच्या सक्षम अधिकाऱ्याने निर्यातीला परवानगी दिल्याचे म्हटले आहे.  इफ्कोला नॅनो युरियाच्या एकूण उत्पादनाच्या २० टक्केहून अधिक निर्यात करता येणार नाही. शिवाय निर्यातीसाठीच्या नॅनो युरिया निर्मितीसाठी अनुदानित कच्चा माल वापरता येणार नाही.  इफ्कोचे कार्यकारी संचालक योगेंद्र कुमार यांनी ट्विट करून ७ जानेवारी २०१९ रोजी निर्यातीसाठीच्या परवानगीसाठी विहित नमुण्यात अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ही परवानगी मिळाली आहे. या बाबतचे पत्रही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.  दरम्यान, केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यसभेत माहिती देताना इफ्कोने नॅनो युरियाच्या निर्यातीसाठी परवानगी मागितल्याचे म्हटले होते. शिवाय नॅनो युरियाच्या वापरातून शेतकऱ्यांचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी वाढणार असून, नायट्रोजनची मोठी बचत होणार असल्याचे म्हटले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com