Agriculture GST : अवजारे, निविष्ठांवरील जीएसटी हटविण्यासाठी पाठपुरावा करू

Agriculture Inputs GST : द्राक्षाच्या नवीन नॉन पेटंट व पेटंट फ्री व्हरायटी शेतकऱ्यांना जास्तीस्त जास्त व कमी दरात उपलब्ध करून देणार आहे. त्याची सुरुवात तळेगाव येथील संघाच्या शेतात लागवड करून केली आहे.
Agriculture GST
Agriculture GSTAgrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतीसाठी लागणारी अवजारे, कृषी निविष्ठांवरील जीएसटी हटविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल, तसेच ठिबक सिंचनावरील अनुदानप्रश्नी विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिली.

खेडगाव ग्रामस्थ, द्राक्ष उत्पादक शेतकरी, ग्रामपंचायत व सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार समारंभ खासदार भगरे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘कादवा’ साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते.

Agriculture GST
Agriculture GST : जाच ‘जीएसटी’चा!

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख, मानद सचिव बबन भालेराव, संचालक सुनील बारहाते, महेश दवंगे, यशवंत ठुबे, उमेश भालेराव, योगेश दवंगे, मोतीराम जाधव, अशोक कावळे, सोपान बोऱ्हाडे, गणेश मोरे, बाळासाहेब वाघ, रवींद्र निमसे, तुषार खापरे, संजय सांगळे, दिगंबर काहांडळ, बाळासाहेब आहेर, ज्ञानेश्वर पगार, विजय जाधव, रावसाहेब भोसले, अशोक वाघ, सुकृत बोऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला.

कैलास भोसले म्हणाले, की द्राक्षाच्या नवीन नॉन पेटंट व पेटंट फ्री व्हरायटी शेतकऱ्यांना जास्तीस्त जास्त व कमी दरात उपलब्ध करून देणार आहे. त्याची सुरुवात तळेगाव येथील संघाच्या शेतात लागवड करून केली आहे. त्यांची चाचणी करून त्या व्हरायटी लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Agriculture GST
Agricultural GST : ‘जीएसटी’चा भार शेतकऱ्यांना झेपेना

श्रीराम शेटे यांनी द्राक्ष बागायतदार संघाचे काम कौतकास्पद असल्याचे सांगितले. खेडगावचे सरपंच दत्तात्रेय पाटील यांनी कीटकनाशक उत्पादक कंपन्या व त्यांच्या दरांवर निर्बंध लावण्याची मागणी केली. माजी संचालक साहेबराव पाटील, सुरेश डोखळे यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे संचालक माणिक पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष अनिल ठुबे, शांताराम बारहाते, विजय डोखळे, बाबूराव डोखळे, उपसरपंच शैलेश शेटे, सुनील शेटे, सचिन पवार, महेश शेटे, गोवर्धन डोखळे, ज्ञानेश्वर डोखळे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ ढोकरे, सुखदेव ठुबे, राजेंद्र ढोकरे आदी उपस्थित होते. जयराम पाटील यांनी आभार मानले.

‘क्रॉप कव्हर’साठी प्रस्ताव देणार

‘क्रॉप कव्हर अनुदान’ व ‘मागेल त्याला क्रॉप कव्हर’ यासाठी अमेरिकेची बाजारपेठ खुली करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत प्रयत्न करणार असल्याचे कैलास भोसले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com