Parbhani News : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई, जवस, राजमा या पिकांचा मिळून एकूण ५ हजार ८७८ हेक्टरवर हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी झाली आहे. त्यापासून सुमारे ७७ हजार २५० क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.
‘महाबीज’तर्फे परभणी विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू, करडई, जवस या पिकांच्या पायाभूत तसेच प्रमाणित बियाणे उत्पादन घेतले जाते. यंदा (२०२३-२४) परभणी विभागामध्ये हरभऱ्याचा ४ हजार ३९९ हेक्टरवर, गहू १८५ हेक्टर, ज्वारी ६१५ हेक्टर, करडई ६११ हेक्टर, जवस ६६ हेक्टर, राजमा २.४० हेक्टर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा व रब्बी ज्वारी बियाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन यावर्षी ज्वारी बीजोत्पादन क्षेत्रात वाढ झाली. करडई व जवस या रब्बीतील प्रमुख गळीत धान्याच्याक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. राजमा या नवीन पिकांच्या फुले वरुण वाणाचा मूलभूत ते पायाभूत बियाणे कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यात घेण्यात आला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात ३९५ हेक्टरने, गव्हाच्या क्षेत्रात ६७ हेक्टरने, ज्वारीच्या क्षेत्रात ९ हेक्टरने, करडईच्या क्षेत्रात २२० हेक्टरने, जवसाच्या क्षेत्रात २६ हेक्टरने वाढ झाली. तर एकूण रब्बी बीजोत्पादन क्षेत्रात ७१९.४ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदाची रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम पीक परिस्थिती सामान्य आहे. यंदा थंडीचे व जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
‘महाबीज’ परभणी विभाग रब्बी बीजोत्पादन
२०२३-२४ कार्यक्रम स्थिती (हेक्टरमध्ये)
जिल्हा...हरभरा...गहू...ज्वारी...करडई...जवस...राजमा
परभणी...१३३५...१३१...१३८...१२८...५...००
हिंगोली...१३४७...२१...००...८९...००...००
नांदेड...३७९...३३...१०...५७...००...००
लातूर...२१४...००...११३...२३०...४२...००
धाराशिव...६०२...००...८७...५५...१९...२.४०
सोलापूर...२२...००...२६७...५२...००...००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.